तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 September 2020

सिरसाळा ग्रामपंचायत कार्यालाय समोर उपोषणास प्रारंभ

 गट नंबर ३४३ अतिक्रमण व ग्रामसेवक बदली प्रकरण
  
निळकंठ भाऊ चाटे व उत्तम माने यांनी दिली भेट 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- येथील गट नंबर ३४३ मधील रेणूका माता मंदिर परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटवण्याच्या मागणी साठी व या अतिक्रमणास अप्रत्यक्षपणे पाठराखण सिरसाळा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक शेख अब्दुला करत असल्याने त्यांची तात्काळ बदली करणे बाबत अमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. मागणी पुर्ण होत नाही तो पर्यंत अमरण उपोषणास बसणार आहोत असे उपोषण कर्ते युवक धर्मा मेंडके, मिलिंद चोपडे, केशव बन्सोडे व अन्य ग्रामस्थांचे म्हणटंले आहे  .
    ह्या उपोषणास भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष निळकंठ भाऊ चाटे, भाजपा किसान सभा प्रदेश सदस्य उत्तम माने तसेच बाळासाहेब फड, दिपक नागरगोजे, हनूमंतराव पवार, पत्रकार दत्ताजी काळे, पत्रकार महादेव शिंदे,  पत्रकार महादेव गित्ते, ग्रामस्थ आक्रम पठान, मधुकर किरवले, रफिक पठान, रविंद्र आरसुळे, शेख नेहाल मनियार,राहुल देशमुख, ललवाणी पारसमल,दिलीप पुरी,  महम्मद इनामदार, शेख नासर दादा, प्रविण सिरसाट आदीसह अनेक जणांनी ह्या अमरण उपोषणास भेट देऊन पाठिंबा दिला आहे.

No comments:

Post a comment