तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 September 2020

पाथरी शहरातील अवैद्य गुटखा विक्री बंद करा;राकाँअल्पसंख्याक सेलच्या वतीने पोलीसांना निवेदन


प्रतिनिधी
 पाथरी:-शहरात गुटखा माफिये अवैद्य गुटखा विक्रीतुन कोट्यावधिंची उलाढाल करत असून संबंधित विभाग जाणिव पुर्वक या बाबींकडे दुर्लक्ष करत असून गुटख्या मुळे कोवळ्या वयातील मुलांचे आरोग्य धोक्यात आले असुन हा अवैद्य पणे गुटखा विक्रीचा व्यवसाय तात्काळ बंद करावा अन्यथा सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळत या विरोधात तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राकाँ अल्पसंख्यांक सेलच्या वतीने सोमवार ७ सप्टेबर रोजी पोलिसांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाने सर्व प्रकारच्या गुटख्यावर निर्मिती,उत्पादन आणि विक्री वर बंदी आणलेली असतांना लॉकडाऊच्या  काळात ही कोट्यावधिंच्या गुटक्याची अवैद्यपणे विक्री सुरू आहे. पाथरी शहरातुनच इतर ठिकाणी गुटखा पुरवठा केला जातो. हा गुटखा लहान लहान मुले सेवन करत असल्याने कॅन्सर सारख्या  भयंकर रोगाला निमंत्रण दिले जात आहे. हा प्रकार अन्न भेसळ विभागाला माहिती असून जाणिव पुर्वक या प्रकारा  कडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ही या निवेदनात करण्यात आला आहे. ही अवैद्य गुटखा विक्री बंद करावी अन्यथा या विषयी लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राकाँ अल्पसंख्यांक सेल चे पाथरी तालुका अध्यक्ष मुबारक बीन सुलेमान चाऊस यांनी निवेदना व्दारे पाथरी पोलिसांना दिला आहे.

No comments:

Post a comment