तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 4 September 2020

हिंगोलीला "रेमडेसिवीर" इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून द्यावा ; खासदार हेमंत पाटील यांची मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्याकडे मागणी


हिंगोली :प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

 हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील काही दिवसांपासून रेमडेसिविर " इंजेक्शनचा तुटवडा  निर्माण झाला असून परिणामी रुग्णाच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे तात्काळ हिंगोली जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून "रेमडेसिविर " इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
              हिंगोली लोकसभा मतदार संघ आणि आणि प्रामुख्याने  हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याच प्रमाणात  रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आहे. परंतु ज्या रुग्णाना कोरोनाचा फुफ्फुसापर्यंत संसर्ग झाला आहे त्यांच्यासाठी "रेमडेसिविर " इंजेक्शन परिणामकारक ठरत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून  या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जिल्हा सामान्य रुग्णालयात होत आहे. या इंजेक्शनची किंमत जास्त असल्याने बाहेरून मागविण्याची सोय नाही परिणामी  ज्या रुग्णाना कोरोनाचा खोलवर संसर्ग आहे त्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे.
     याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी लक्ष देऊन पाठपुरावा केला आहे. या संदर्भात  राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांना पत्रव्यवहार करून हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी विशेष बाब म्हणून तात्काळ "रेमडेसिविर " इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे. 
     कोरोनाचा संसर्ग राज्यात सुरू झाल्या पासून खासदार  हेमंत पाटील यावर लक्ष ठेवून आहेत. मतदार संघात आरोग्याच्या बाबतीत कोणतीही समस्या उद्भवल्यास तात्काळ मदत दिली जात आहे. 
    रुग्णाना बेड उपलब्ध करून देणे, सॅनिटायझर, मास्कचा पुरवठा करणे, गरजूंना धान्य वाटप करणे, लॉकडाऊन मध्ये बाहेर  देशात आणि  परराज्यात अडकून पडलेल्याना परत आणण्याचे काम केले आहे. कोरोनाकाळात संपूर्ण मतदारसंघाचा  अनेक वेळा दौरा करून सर्वच आरोग्य केंद्राची पाहणी करून कमी असलेल्या सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत आणि ते सातत्याने आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात आहेत.


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

शिवशंकर निरगुडे मो नंबर 8007689289

No comments:

Post a comment