तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 3 September 2020

महा कला मंडल महाराष्ट्र या कला क्षेत्रातील नव्या संस्थेची स्थापना

(पुणे प्रतिनिधी)
लग्न समारंभ , कौटुंबिक कार्यक्रम , सार्वजनिक मंडळाचे उत्सव , संस्थेचे वर्धापनदिन असे विविध सांस्कृतिक सोहळे साजरे करण्यासाठी आयोजकांना सनई चौघड्या पासून  ते  हिंदी-मराठी   वाद्यवृंदा पर्यंत  बरेच मनोरंजक कार्यक्रम सादर करणाऱ्या निर्मिती संस्थाची आवश्यकता असते. तसेच त्या सांस्कृतिक मनोरंजक कार्यक्रमांच्या अविस्मरणीय आठवणी बंदिस्त करण्यासाठी व्हिडिओ छायाचित्रण , फोटोग्राफी करणाऱ्या तंत्रज्ञानाची आयोजकांना निश्चितच गरज लागते. पण असे सांस्कृतिक सोहळे यशस्वीपणे संपन्न झाले की तीन चार तास रसिकांना आनंद  देण्यास सदैव तत्पर असणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांकडे कोणीही नंतर  ढुंकूनही पाहत नाही.  ज्याप्रमाणे डाळीतील कढीपत्ता  जसा जेवताना ताटाच्या बाहेर काढला जातो त्याप्रमाणे यांच्या संदर्भात बोललं जातं असतं हे नाकारता येणारं नाही.  महाराष्ट्रात जसे फर्लांगभर गेलं की भाषा व अन्न संस्कृती बदलते तशीच लोककलेची संस्कृती सुध्दा  बदलते. कोकणातली दशावतारा पासुन तमाशाच्या कणादिसह विदर्भातील झाडे पट्टी , खेळे मेळे सादर करणारे लोककलाकार व तंत्रज्ञ लाखांच्या संख्येत असले तरी संघटीत नसल्याने शासन दरबारी  ते कलावंत सोयी सवलती पासून आजवर  दूर राहिलेले आहेत. त्यांची शासन दरबारी नोंद नसल्यामुळे आजवर त्या कलाकारांना अपात्र ठरवले जाते. त्यां कलाकारांची एकत्र मोट बांधायाची आहे. या लोककलेच्या क्षेत्रातील लोकांना सरकारला कधी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावी लागली नाही. कारण  ते आत्मनिर्भर होते आणि या पुढे देखील आत्मनिर्भर राहातील यात मुळीच शंका नाही. पण कोरोना महामारी सारख्या आजारामुळे आता खुप अडचणी निर्माण झाल्या आहे. काही लाख स्वयं रोजगाराच्या माध्यमातून आत्मनिर्भर असलेल्या लोकांना बेरोजगार व्हावे लागले आहे . 
महाराष्ट्राच्या मध्यवर्ती असलेल्या कलेची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्य नगरीत म्हणजे  पुण्यात गुरुवारी १३ ऑगस्ट २०२० रोजी श्री. मेघराज भोसले यांच्या अध्यक्षतेखाली  *महा कला मंडल* या शिखर संस्थेची नुकतीच  स्थापना करण्यात आली आहे. ही घटना सर्व  कलाकार  व तंत्रज्ञ मंडळीना एका छत्राखाली एकत्र आणून  न्याय व हक्कची लढाई उभी करण्यासाठी महत्त्वाची नांदी आहे.     
या लढ्यात महाराष्ट्रातील  १०० पेक्षा अधिक संघटना व त्यांचे एकत्रित अंदाजे ६ लाखांपेक्षा अधिक कलाकार या शिखर संघटनेच्या माध्यमातून संघटीत झाले आहेत.
*या संस्थेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत -*
या कलाक्षेत्राला 'इंडस्ट्रीचा' दर्जा  प्राप्त करून देणे , कलाक्षेत्रात संलग्न कलाकार तंत्रज्ञ तसेच  सेवा पुरवणा-या अनेक संस्थांची सरकार दरबारी नोंद व्हावी , प्रत्येक कलाकाराला सरकारने हक्कचा आरोग्य  विमा मिळवून द्यावा , शासकीय  सवलतीने हक्काचं घर व एकत्रित  विकासासाठी भूखंड  मिळावे , सरकारकडे त्या सर्व कलाकारांचा 'डाटाबेस' असावा , आपत्कालीन  प्रसंगात योग्य ती मदत व आर्थिक पॅकेजची मागणी करणे ,ज्येष्ठ कलाकारांच्या मासिक निवृत्तीचे वेतन वाढवणे व निश्चित करणे , 
म्हाडा - सिडकोमध्ये  घरासाठी स्पेशल  कोटा मागणे ,
काॅपी राईट नावावर कलाकार  व निर्मात्याची होणारी आर्थिक  पिळवणूक  थांबवण्यासाठी प्रयत्न करणे. तसेच या 
 सारख्या अनेक विषयावर  काम करण्यात येणार आहे , असे संस्थेचे अध्यक्ष  मेघराज भोसले यांनी सांगितले.या वेळी उदय साटम , मनोज भाई संसारे , खबियाजी , डी.महेश , सुशांत शेलार , प्रशांत भाटकर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी परेश दाभोलकर यांनी सुत्रसंचलन  आणि निवेदन केले.

No comments:

Post a comment