तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 1 September 2020

कौठळी परिसरातील सोयाबीन पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान तातडीने पंचनामे करुन मदत द्या-भालचंद्र गुंजकर


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मौजे कौठळी व परिसरातील सोयाबीनचे पीक पावसाअभावी वाया गेले आहे. मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीकाचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी कौठळी गावचे उपसरपंच भालचंद्र गुंजकर यांनी केली आहे. 
         तालुक्यात यावर्षी खरिपाच्या हंगामाला जून पासून सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांनी पेरणीला जोरदार सुरुवात केली सोयाबीनच्या पीकाचे सध्या कौठळी परिसरात पाऊस चांगला पडल्या नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच  दरम्यान झालेल्या संततधार पावसामुळे सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे. सोयाबीन पिकावर बुरशीजन्य संसर्ग, खोडकिडीचा प्रादुर्भाव पाने खाणारी अळी यामुळे फुले, पात्या,शेंगा 100% गळल्या असून झाड उभे आहे. शेतामध्ये सोयाबीन चे झाड पिवळे पडले असून मोठा पावस न झाल्यामुळे  सुकु लागले आहे. 
      सोयबीनच्या बोगस बियाणेमुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यावर संकट ओढावले परिणामी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. या संकटाला तोंड देत न डगमता शेतकऱ्यांनी पेरणी केली. पीकाला आवश्यक असणारा पाऊस वेळेवर कमी प्रमाणात पडला आहे. आणखी ही मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.थोड्या थोड्या पावसावर सोयाबीन ही वाढही मोठ्या जोमात झाली. कधी नव्हे ते या वर्षी बहरलेले सोयबीनचे नुकसान झाले आहे. आधीच कमी पाऊस त्यातच मागील तालुक्यात संततधार भिज पावसाने सोयबीनसह उडीद, मुगाला रोगराई व किडीने ग्रासल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे सोयबीनची केवळ वाढच झाली आहे. फलधारणा मात्र झाली नाही. याचा फटका शेतकऱ्यांना जबर बसला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी अंधकारमय चाकोरीतून वाटचाल करीत असून दुष्काळाच्या झळा सोसत आहे. दर वर्षी होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे एकरी एक किलो सोयाबीन होणार नाही.अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी कौठळीचे उपसरपंच भालचंद्र गुंजकर यांनी केले आहे.

1 comment: