तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 5 September 2020

पंकजाताई मुंडे यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम.. त्या, घेतील तो निर्णय मान्य ; ऊसतोड मजूरांचा निर्धार

दरवाढीसाठी राज्यातील ऊसतोड कामगार एकवटले

बीड, नगर जिल्हयात विविध ठिकाणी मजूरांच्या बैठका

बीड (प्रतिनिधी) :-  दि. ०५ ----  साखर कारखान्यांनी मजुरीत दरवाढ करावी या मागणीसाठी राज्यातील ऊसतोड कामगार एकवटला आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढणा-या ऊसतोड मजूरांच्या नेत्या पंकजाताई मुंडे हया आमच्यासाठी खंबीर आहेत, याबाबत त्या घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असा this7 एकमुखी निर्धार कामगारांनी विविध बैठकांमधून केला. 

  ऊसतोड कामगारांना दरवाढ करावी या व अन्य मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बीड, केज, मांजरसुंबा व अहमदनगर जिल्हयात ऊसतोड कामगार ठिक ठिकाणी बैठका घेत आहेत. नगर जिल्ह्यात आ. मोनिकाताई राजळे, बीड जिल्हयात माजी आमदार केशवराव आंधळे, श्रीमंतराव जायभाये, गोरक्ष रसाळ,  अक्षय मुंदडा, सर्जेराव डोईफोडे, दत्तोबा भांगे, सर्जेराव वाघमोडे, महादेव बडे, महादेव तोंडे, देविदास तोंडे, सुखदेव सानप, चेमटे मामा, कृष्णा तिडके, माणिक खेडकर, अशोक खरमाटे, पिराजी किर्तने तसेच अन्य मजूर व मुकदमांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

 या बैठकांमध्ये ऊसतोड कामगार आपल्या भावना व्यक्त करतांना म्हणाले की, लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जाण्यानंतर पंकजाताई मुंडे यांनी ऊसतोड मजूरांची जबाबदारी व नेतृत्व स्विकारून ऐन दुष्काळाची परिस्थिती असताना सुध्दा आम्हाला वाढ मिळवून दिली होती आणि एवढंच नाही तर परत मागच्या वर्षी अत्यंत कठीण परिस्थिती असतानाही अंतरिम वाढ मिळवून दिली.

पंकजाताईंचा आदेश अंतिम

यावर्षी देखील दरवाढीची आमची मागणी आहे, मात्र  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढी संदर्भात पंकजाताई घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल.
दुसरा कोणीही आमच्यासाठी कांही करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.  पंकजाताई आमच्यासाठी खंबीर आहेत आणि त्यांचा निर्णय आम्हाला अंतिम आहे. त्यांच्यासाठी ऊस तोड कामगार हा राजकारणाचा विषय नाही तर जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे त्या
न्याय्य भूमिका घेतील असा आम्हाला विश्वास आहे. पंकजाताई मुंडे यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम आहे अशा भावना कामगारांनी व्यक्त केल्या. या बैठकीत ऊसतोड कामगारांची पंकजाताई मुंडे यांच्या पाठिमागे असलेली  एकजूटीने दिसून आली.

No comments:

Post a comment