तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 8 September 2020

ग्रामपंचायत प्रशासक पदावरून पशुधन पर्यवेक्षक यांना कार्यमुक्त करा परमेश्वर इंगोले यांची मागणी


हिंगोली प्रतिनिधी 

ग्रामपंचायत प्रशासक पदावरून कार्यमुक्त करा अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिन परमेश्वर इंगोले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे आज दि 08/09/3020 ला एका निवेदनाद्वारे केली आहें 
हिंगोली  जिल्ह्यात #लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे,  संसर्गजन्य रोग असून लागण झालेल्या जनावरांना वेगळे ठेवणे आणि तात्काळ उपचार करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात  पशुवैद्यकीय अधिकारी कमी प्रमाणात असताना त्यांना अतिरिक्त कारभार म्हणून ग्रामपंचायत प्रसाशक म्हणून नेमण्यात आले आहें जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्यामुळे अनेक ठिकाणी जनावराची गैरसोय होत आहे आणि  प्रसाशक कामात गुंतलेले पशुधन  पर्यवेक्षक लक्ष द्यायला तयार नसल्यामुळे जनावरांचे हाल होत आहेत त्यामुळे प्रसाशक पदावरून त्यांना हटविण्यात यावे अशी मागणी परमेश्वर इंगोले राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिन  यांनी केली आहें

No comments:

Post a comment