तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 September 2020

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यास दिरंगाई ;पालकमंत्र्याचे आदेश धाब्यावर

त्वरीत पंचनामे करा अन्यथा तीव्र आंदोलन-राजेश गित्ते 

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :-
 परळी तालुक्यात पावसाळ्याच्या शेवटी व परतीच्या पावसाने ऊस पिकासह काढणीस आलेल्या सोयाबिन,बाजरी,ज्वारी व कापसाचे मोठे नुकसान झाले असुन शेतकर्यांना हेक्टरी 25 हजाराची मदत द्या अशी मागणी भाजपा युवानेते राजेश गित्ते यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी शिष्टमंडळाने केली आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पिकांचे त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी देवुनही महसुल प्रशासनाकडुन अद्यापपर्य॔त पंचनामे करण्यात दिरंगाई करुन पालकमंत्र्याचे आदेश धाब्यावर बसवले आहेत.परळी तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन त्वरीत मदत दिली नाही तर भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा युवानेते राजेश गित्ते यांनी दिला आहे.
    यावर्षीच्या अत्य अल्प पावसामुळे परळी तालुक्यातील खरीप हंगामातील कापूस,सोयाबीन,बाजरी,ज्वारी,मुग आदी पिके करपली होती.परंतु पावसाळ्याच्या शेवटी व परतीच्या पावसानेकाढणीला आलेल्या या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.सुसाट्याच्या वार्याने ऊस, कापुस,ज्वारी ही पिके जमीनदोस्त झाली आहेत पडलेल्या ऊसाला उंदिर,डुकरांची लागन होवुन नुकसान होत आहे तर कापसाची पकलेली बोंडे नासत आहेत.पावसामुळे नुकसान झालेल्या या पिकांचे पंचनामे तात्काळ करावेत असे आदेश पालकमंत्र्यांनी प्रशासनास देवुनही मागील आठ दिवसात प्रशासनाकडुन पंचनामे करण्यात आलेले नाहीत ही एकप्रकारे पालकमंत्र्याच्या सुचनांची अवहेलना असुन पंचनामे झाल्यानंतरच शेतकर्यांना शासनाकडून मदत मिळणार आहे.
या पुर्वी गेली पंधरा दिवस आधी02/09/2020रोजी शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते. आता जर प्रशासनाने या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे त्वरीत केले नाहीत तर भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा युवानेते राजेश गित्ते यांच्यासह पंचायत समितीचे माजी सदस्य मारोती फड,माणिकराव मुंडे, वचिष्ठ सोळंके, ज्ञानोबा शिंदे, सुरेश शिंदे, लक्ष्मण शिंदे, गोपाळ जाधव, दगडू सोळंके, अशोक पवार, श्रीराम मुंडे आदींनी दिला आहे.

No comments:

Post a comment