तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 September 2020

कै.ल.दे.महिला महाविद्यालया मध्ये प्रा.प्रविण फुटके यांचा सत्कार


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  येथील प्रा.प्रविण फुटके सर यांची.महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या मराठवाडा सेवा आघाडीच्या उपसचिव पदी निवड झाल्याबद्दल कै.ल.दे.महिला महाविद्यालयात प्राध्यापक मंडळींच्या वतीने सत्कार करण्यात आला.
      दै.सकाळचे प्रतिनिधी तथा कै.ल.दे.महिला महाविद्यालयातील प्रा.प्रविण फुटके सर यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी कै.ल.दे.महिला महाविद्यालय संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख , प्रा.अशोक पवार, प्रा. विशाल पौळ, मारोती देमगुंडे यांच्यासह कै.ल.दै.महिला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक मंडळी उपस्थित होते.

No comments:

Post a comment