तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 September 2020

नंदनजचे उपसरपंच योगिराज गुट्टे यांचे दुःखद निधन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) नंदनजचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच योगीराज गुट्टे यांचे आज दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५५ वर्षे होते. त्यांच्या अकाली निधनाने परळी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
       योगीराज गुट्टे हे गेल्या पंधरा दिवसांपासून आजारी होते. लातूर येथील खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार चालू होते. तब्येत जास्त बिघडल्याने नातेवाईकांनी त्यांना काल मंगळवार दि. ८ सप्टेंबर रोजी हैदराबाद येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना बुधवार दि. ९ सप्टेंबर रोजी पहाटे सायंकाळी ७ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
     परळी तालुक्यातील धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात हिरीरीने सहभाग असे. त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कै. योगीराज गुट्टे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी  नंदनज येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.गुटे परिवारावर कोसळलेल्या दुःखात तेजन्यूज हेडलाईन्स परिवार सहभागी आहे.

No comments:

Post a comment