तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 September 2020

खरीप पिकां साठी जायकवाडीचे पाणी द्या;शिवसेनेची उपविभागीय अधिकारी यांच्या कडे मागणी.

प्रतिनिधी

पाथरी:-तालुक्यात मागील पंधरा वीस दिवसा पासून पावसाने उघडीप दिली आहे.त्या मुळे खरीपाची पिके माना टाकत आहेत. या पिकांना जिवदान देण्या साठी  बी५९ या वितरीकेला जायकवाडीचे पाणी देण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे आणि उपतालुका प्रमुख हरीभाऊ वाकनकर यांनी निवेदना व्दारे पाथरी येथील उपविभागिय अधिकारी यांना सोमवार ७ सप्टेबर रोजी निवेदनाव्दारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की,सद्य स्थितीत मागिल पंधरा ते विस दिवसा पासून तालुक्यात मान्सूनच्या पावसाचा खंड पडला असल्याने पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. सोयाबीन पिक दाने भरण्याच्या अवस्थेत असून कापसाची बोंडे पक्व होण्या साठी पाण्याची नितांत गरज आहे. सोबतच तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊसाचे पिक असुन या पिकालाही पाण्याची आवश्यकता आहे. या वर्षी जायकवाडी धरण पुर्ण क्षमतेने भरले असून पाणी नदी पात्रात सोडले जात आहे. असे असतांना डाव्या कालव्यात पुर्ण क्षमतेने पाणी सोडल्यास या पाण्याचा शेती पिकांना फायदा होईल तसेच भुजल पातळी वाढून पिण्या पाण्या साठी मोठा उपयोग होईल.आगोदरच सतत बुरबुर पडलेल्या पावसाने मुगाचे पिक हातचे गेले आहे.

 या आठ दिवसांत सोयाबीन,कापुस या पिकांना पाणी नाही मिळाले तर उत्पादनात प्रचंड मोठी घट येणार आहे. हलक्या जमिनिवरील पिके मानाटाकू लागली असल्याने "बी ५९" या वितरीकेला त्वरीत पाणी सोडून शेतक-यांची पिके वाचवावीत अशा प्रकारे निवेदना व्दारे शिवसेनेच्या वतीने पाणी पाळी देण्या साठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे. या वेळी त्यांच्या सोबत शिवसेनेेचे उपतालुका प्रमुख हरीभाऊ वाकनकर हे होते.

No comments:

Post a comment