तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 4 September 2020

युवक नेते बाळासाहेब फड यांचे दुःखद निधन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील युवक नेते, जय भगवान महासंघाचे तालुकाध्यक्ष तथा भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते बाळासाहेब फड यांचे आज दु:खद निधन झाले. त्यांच्या मृत्यूबद्दल शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय अवघे 33 वर्षे होते. 
      बाळासाहेब फड हे अंकुशराव फड यांचे चिरंजीव तर माणिक नगर भागातीलच नव्हे तर परळी शहरातील युवक नेते म्हणून त्यांची ओळख होती. बाळासाहेब हे गेल्या दोन दिवसांपासून ते आजारी होते. आज दि. 4 सप्टेंबर रोजी दुपारी 5 वाजण्याचे सुमारास त्यांची अंबाजोगाई येथे प्राणज्योत मालवली. 
      बाळासाहेब फड यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, बहीण असा भरगच्च परिवार आहे. 

जिल्ह्यात हळहळ 
       बाळासाहेब फड यांचा संपुर्ण जिल्ह्यात संपर्क होता. युवकांमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता होती. बाळासाहेब यांचे निधन झाल्याचे समजताच सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहणारे संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. कुणाच्याही अडीअडचणीला मदत करण्याच्या स्वभावामुळे ते लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a comment