तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 September 2020

पुरोगामी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बालाजी जगतकर त्यांची नियुक्ती


बीड (प्रतिनिधी) :- पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य मुंबई चे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या सूचनेवरून बीड जिल्हा पुरोगामी पत्रकार संघाच्या बीड जिल्हाअध्यक्षपदी बालाजी यांची निवड करण्यात आली आहे, पत्रकारिता क्षेत्राचा दहा वर्षाचा अनुभव व पत्रकारिता क्षेत्राच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी बातम्या करून त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत, उच्चशिक्षित असले जगतकर हे निश्चितपणे बीड जिल्ह्याच्या संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वाचं काम करतील अशी अपेक्षा वरिष्ठांना आहे, साप्ताहिक बीड अक्षरधाम व दैनिक दिव्यअग्नि जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहतात त्यांनी अनेक दैनिकांमध्ये वेगळ्या पदावर ती काम केलेला आहे. निर्भीड पत्रकार म्हणून त्यांची जिल्हात चांगल्या पद्धतीने ओळख आहे. त्यांच्या निवडीमुळे निश्चितपणे पत्रकारांच्या समस्या, पत्रकार होणारे हल्ले,विविध मागण्यांसंदर्भात वाचा फुटेल, व पत्रकारांच्या विविध प्रश्न साठी पुढाकार घेतील, या निवडीने बीड जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांचे मध्ये उत्साहाचे वातावरण आहे, त्यांना अनेक सामाजिक, राजकीय, धार्मिक, विविध पक्ष, संघटनांच्या वतीने  शुभेच्छा देण्यात येतात आहेत.

No comments:

Post a comment