तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 September 2020

प्रा.डाॅ. साहेबराव राठोड यांच्या लिखित पुस्तकाचे मोफत वाटप

 प्रतीनिधी 
पाथरी:-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा बंजारा समाजाचे नेते लोकनायक वसंतराव नाईक यांचे विचार घराघरात पोहचले पाहीजेत यासाठी वस़ंतराव नाईक यांच्या जिवनावर पाथरी येथील स्व . नितीन महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डाॅ.साहेबराव राठोड यांनी कोरोना कालावधी मध्ये दोन पुस्तके लिहुण अनेक ग्राथंलयास  वाटप करुन‌ सामाजिक बांधिलकीचे कार्य जोपासले आहे.
वसंतराव नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी महाराष्ट्रातील  पुसद तालुक्यात गहुली तांडयात बंजारा समाजात झाला कुठलीच राजकिय पार्श्वभूमी नसताना स्वताःच्या हिमंतीवर वसंतराव नाईक यांनी हे जवळपास आकरा वर्षं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होते वसंतराव नाईकांनी महाराष्ट्राला घडविण्यासाठी अहोरात्र परीश्रम घेतले . मुख्यमंत्री असतानाही रोजगार हमीच्य कामावर स्वता धुमस मारणारे असे मुख्यमंत्री होणे नाही. राजकीय जीवनात सामाजिक कार्य करीत असताना त्यांचा पाथर्डी येथे एक एक रूपया गोळा करूण जीवंतपणीच  पुतळा ऊभारण्यात आला होता. ज्याने महाराष्ट्र ऊभारणीचे काम केले आहे असे ते वसंतराव नाईक, यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले आहे आधुनिक तंत्रज्ञान, रोजगार हमी योजना, पंचायत राज, कृर्षी धोरण, धरण निर्मित असी अनेक कामे वसंतराव नाईक यांच्या काळात झाली आहेत. परंतु पुस्तक रूपात ऊपलब्ध नसल्याने हे जाणून पाथरी येथील स्व.नितीन महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डाॅ. साहेबराव राठोड यांनी  "वाटोड्या नायेक वसंतराव" हे पुस्तक लिहुन  समाजातली, अनेक कुटुंबांना व विविध ग्रंथालयास मोफत भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करीत असल्याने विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a comment