तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 September 2020

विकेल ते पिकेल या धोरणावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शेतकऱ्यांशी साधणार ई-संवाद कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे- तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे विविध कृषीविषयक योजनांच्या संदर्भात 10 सप्टेंबर रोजी दु.12 ते. 1.30 वाजता  शेतकऱ्यांशी ई-संवाद कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, महिला व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी केले आहे.
         या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्य मंत्री  विश्वजित कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, कृषी सचिव एकनाथ डवले, पोकराचे प्रकल्प संचालक रस्तोगी, कृषी आयुक्त धीरज कुमार यांची उपस्थिती राहणार आहे. 
         मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या “विकेल ते पिकेल" या संकल्पनेवर आधारीत कृषि विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.  या अनुषंगाने 10 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्री महोदय राज्यातील शेतक-यांशी ई-संवाद साधाणार  आहेत. 
         कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाचे क्षेत्रिय कर्मचारी ग्रामपातळीवर स्थानिकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. सदर कार्यक्रमाचे कृषी विभागाच्या यू-टयूब चँनल वर लाईव्ह प्रसारण करण्यात येईल. 
       विकेल ते पिकेल अंतर्गत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अभियानाची सुरुवात करण्यात येईल. याप्रसंगी मुख्यमंत्री ग्रामपातळीवरील कृषी  विकास कार्यक्रमाची रूपरेषा मांडून चिंतामुक्त शेतकरी व शेतकरी केंद्रीय कृषी विकास यावर आपले विचार मांडतील  व शेतकऱ्यांशी संवाद साधतील. 
    तालुक्यातील शेतक-यांना http://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM या लिंक क्लिक करुन परिसंवादात  सहभागी होता येणार आहे. तालुक्यातील  कृषि सहायक व ग्रामस्तरावरान इतर यंत्रणा यांनी कार्यक्रमाचे आयोजन करुन जास्तीत जास्त शेतक-यांना या संवादात सहभागी  करावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी केले.

No comments:

Post a comment