तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 2 September 2020

स्वाक्षरी मोहिमेला उत्सुर्फ प्रतिसादअरुणा शर्मा

पालम : - महाराष्ट्रात वैद्यकीय प्रवेशाचा अन्यायकारी 70/30 फाॅर्मुला तात्काळ रद्द करावा यासाठी पुर्ण मराठवाड्यात परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या पुढाकाराने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. खासदार संजय जाधव यांच्या स्वाक्षरी मोहिमेला पालममधे दिनांक 2 सप्टेंबर रोजी सुरुवात झाली. ममता विद्यालय येथे विद्यार्थी व पालक यांची स्वाक्षरी घेऊन शुभारंभ करण्यात आला. शहरातील व तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने आपल्या मुलांच्या भविष्यासाठी या स्वाक्षरी मोहिमेत भाग घेऊन खासदार संजय जाधव यांच्या आवाहनला प्रतिसाद द्यावा असे आवाहन शिवसेना तालुकाध्यक्ष हनुमंतराव पौळ यांनी केले आहे. या स्वाक्षरी मोहिमेत तालुका प्रमुख हनुमंतराव पोळ, शहरप्रमुख गजानन पवार, ऊपतालुका प्रमुख श्रीकांत कराळे, बनवस सर्कल प्रमुख सुभाषराव पाटील, युवासेना तालुका प्रमुख ओमकार सिरस्कर, युवासेना शहरप्रमुख गजानन सिरस्कर आदी शिवसेना पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

No comments:

Post a comment