तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 September 2020

समाजकार्य पदवीधर मंडळाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रा.डॉ.बालाजी मुंडे यांची निवड , सर्व स्तरातून अभिनंदन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  येथील प्रा.डॉ.बालाजी मुंडे यांची समाजकार्य पदवीधर मंडळ, महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश उपाध्यक्षपदी मंडळाचे अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी नुकतीच नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे. निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 
               समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ महाराष्ट्र, राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी परळी येथील प्रा.डॉ.बालाजी मुंडे  यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या मागील समाजकार्याचा अनुभव व कार्य लक्षात घेता त्यांची निवड करण्यात आली असून विद्यार्थी संघटन तसेच समाजकार्याच्या व इतर विभागाच्या विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन व विविध शैक्षणिक, सामजिक अडचणी सोडवण्यासाठी समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ कार्य करते त्यांच्या या निवडीबद्दल अध्यक्ष अनिल गायकवाड, सचिव शिवराम ठवरे,आदींनी अभिनंदन केले आहे व त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक, पत्रकार, राजकीय व विविध सर्वत्र क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a comment