तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 4 September 2020

परळी शहरातील अवैध्य धंदे बंद करा- वंचित बहुजन आघाडीची मागणी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-परळी शहरातील अवैध्य धंदे जोरात सुरु असुन खुलेआम हातभट्टीची दारू व गुटखा विक्री होत आहे यामुळे या अवैद्य धंद्याला पोलीस प्रशासन व अन्नभेसळ प्रशासन यांची परवानगी आहे का? अशी शंका येऊ लागली आहे.
गेल्या 6 महिन्यापासुन कोरोना सारख्या महामारीमुळे शहरातील जनजिवन विस्कळीत झाले आहे. गोर-गरिबांच्या हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यात हे अवैध धंदे ज्यांच्या घरी व्यसनी लोक आहेत त्यामुळे त्यांचे संसार उध्दवस्त होवून तरुण व्यसनाधिन झाली आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहर पोलीस स्टेशन व संभाजीनगर पोलीस स्टेशन यांना अवैद्य धंदे बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अवैद्य धंदे बंद झाली नाहीत तर वंचित आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्हा महासचिव मिलींद घाडगे, जि.उपाध्यक्ष प्रसन्नजीत रोडे, जेष्ठ नेते एन.के.सरवदे युवाध्यक्ष साहेबराव रोडे, परमेश्वर लांडगे, गफारशा खान,धम्मानंद क्षिरसागर, इत्यादी पदांधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

No comments:

Post a comment