तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 September 2020

आरक्षणासाठी सोनपेठ येथील सकल मराठा समाजाचे शासनाला निवेदन

मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा 

सोनपेठ/ प्रतिनिधी 
मराठा आरक्षणाबाबत सुनावणी दरम्यान अंतीम निर्णयासाठी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण घटनापिठाकडे पाठवत असताना एस इ बी सी अंतर्गत असलेले मराठा आरक्षण स्थगित केले आहे.त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असुन त्यामुळे मराठा समाजावर अन्याय होत आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी येथील सकल मराठा समाजाच्या वतिने येथील तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
गायकवाड आयोग या मागासवर्गीय राज्य आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला ओ बी सी मध्ये सामावून घेण्यात यावे आणि सद्यस्थीतीत ओ बी सी मध्ये असलेले वेगवेगळ्या वर्गाच्या धरतीवर वेगळी सबकॅटेगरी तयार करून त्याअंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे,नच्चिअप्पन आयोगाच्या शिफारशी लागु करत केंद्र सरकारने कायदा करण्यासाठी राज्य सरकारने शिफारस करावी,चालु शैक्षणिक वर्षात कोणत्याही मराठा विद्यार्थयांचे नुकसान होणार नाही यासाठी आरक्षणाचा निकाल येईपर्यंत सर्व क्षेत्रात एसईबीसी प्रमाणे आरक्षण कायम ठेवावे.अन्यथा नोकरभरती करण्यात येऊ नये,तालुका,जिल्हा व विभागीय स्तरावर मराठा समाजासाठी वस्तीगृह सुरू करावे,आरक्षणानुसारची बाकी असलाली स्काॅलरशीप शुल्क तात्काळ अदा करावी आणि याबाबत राज्य सरकारने भार स्विकारावा अशा स्वरूपाच्या मराठा समाजाच्या  वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या मागण्यांचा गांभीर्याने विचार होऊन त्या तात्काळ पुर्ण कराव्यात अन्यथा सकल मराठा समाज यापुढे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल असा इशारा सुध्दा देण्यात आला आहे.या निवेदनावर शिवाजी कदम,रामेश्वर जोगदंड,प्रकाशराव भोसले,रामेश्वर बचाटे,दिपक रोडे, बालाजी इंगोले,भगवान पायघन,माधव जाधव,रामेश्वर गांगर्डे,लक्ष्मण जोगदंड,दिपक गांगर्डे ,भागवत गांगर्डे,गणेश रोडे,शिवराज जोगदंड, यांच्यासह सकल मराठा समाजाच्या असंख्य बांधवांच्या स्वाक्ष-या

No comments:

Post a comment