तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 6 September 2020

राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांना फुलकळस येथे श्रद्धांजली


ताडकळस/वार्ताहर 

 ताडकळस येथून जवळच असलेल्या फुलकळस येथे रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता फुलकळस येथे शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रा. मनोहर धोंडे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत शिवा संघटना फुलकळस शाखेच्या वतीने वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवा संघटना तालुका प्रमुख चक्रधर शिराळे ,सुर्यकांत शिवणकर , गजानन शिराळे, शाखा प्रमुख बबन सरकाळे यांच्यासह आदी समाजबांधव उपस्थित होते. राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज हे विज्ञान व अध्यात्माची सांगड घालत मानव कल्याणासाठी कार्य करणारे ऋषीतुल्यं व्यक्तिमत्वं होते. समाजप्रबोधन, जातीनिर्मुलनाच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्र उभारणीसाठी मोलाचं योगदान दिलं. महाराजांनी दिलेले विचार, केलेलं कार्य पुढं घेऊन जाणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे असे मत सुर्यकांत शिवणकर यांनी मांडले. यावेळी वैजनाथ शिराळे, शिवशंकर शिराळे, बापुराव पाटिल, नागोराव शिराळे, लक्ष्मण धुळशेटे, माधव धुळशेटे, सिद्धेश्वर कुबडे, काशिनाथ कुबडे, प्रल्हाद धुळशेटे, डिगांबर लाटिकर, राजेश गुंजकर ,विठ्ठल कुबडे,मन्मथ नावकिकर,अण्णा गव्हाळे, माधव मिसाळ, रंगनाथ सलगर, विठ्ठल माने, सखाराम शिराळे, मन्मथ शिराळे, माधव हारणे, महिलांमधुन यशोदाबाई शिराळे, भोगावती कुबडे, विमलबाई सरकाळे, कुसुमबाई धुळशेटे, अहिल्याबाई धुळशेटे, यमुनाबाई भाटेगावकर आदींसह गावकरी पुरुष व महिला मंडळी, भजनी मंडळी उपस्थित होते. यावेळी शिवा संघटनेतर्फे भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

No comments:

Post a comment