तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 4 September 2020

संभाजी ब्रिगेड परळी तालुकाध्यक्षपदी शिवश्री देवराव लुगडे महाराज यांची फेरनिवड


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
आज दिनांक 1 सप्टेंबर मंगळवार रोजी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष शिवश्री प्रवीण ठोंबरे सर यांच्या अध्यक्षतेखाली व संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष शिवश्री गोविंदाप्पा पोतंगले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कार्यकारिणीची निवड बैठक पार पडली. या बैठकीत संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्षपदी शिवश्री देवराव लुगडे महाराज तालुका कार्याध्यक्षपदी शिवश्री वैभव काकडे तालुका कार्याध्यक्षपदी शिवश्री शिवश्री प्रदुम सोनवणे तालुका उपाध्यक्ष पदी  नंदू शिंदे तालुका संघटक पदी शिवश्री हनुमान दिवटे यांची निवड करण्यात आली .पुढील उर्वरित तालुका कार्यकारणी व शहर कार्यकारणी लवकरच निवडली जाणार असून संभाजी ब्रिगेडच्या ध्येय धोरणानुसार व संभाजी ब्रिगेडचे बीड पूर्व जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रवीण ठोंबरे सर यांच्या आदेशानुसार येणारी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने .गाव गाव घर गल्लोगल्ली संभाजी ब्रिगेड चे काम वाढावे या अनुषंगाने तालुका कार्य करण्याची फेर निवड करण्यात आली. या महत्त्वपूर्ण बैठकीत संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्षपदी शिवश्री देवराव लुगडे महाराज यांची फेर निवड करण्यात आली
 निवड झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे काम जोमाने केले जाईल असे आश्वासन नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज यांनी बैठकीमध्ये केले.
.आज झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेड बीड पूर्व जिल्हा अध्यक्ष प्रवीण ठोंबरे सर मार्गदर्शक म्हणून संभाजी ब्रिगेड बीड पूर्व माझी जिल्हा अध्यक्ष शिवश्री गोविंद आप्पा  पोतंगले या बैठकीला प्रमुख उपस्थिती मध्ये मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री इंजि. संजय नाना देशमुख ,जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री अंकुशराव जाधव, मराठा सेवा संघ परळी तालुकाध्यक्ष शिवश्री ईश्वर जीजा सोनवणे ,तालुका कार्याध्यक्ष शिवश्री रामराव तात्या जाधव, शहराध्यक्ष संदीप काळे, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष शिवश्री दिपक शिंदे सर , मराठा सेवा संघ माझी तालुका अध्यक्ष राजेश ठोंबरे साहेब*श ,संभाजी ब्रिगेडचे माजलगाव विधानसभा अध्यक्ष शिवश्री पांडुरंग आबा देशमुख ,संभाजी ब्रिगेडचे शिवश्री  राम किर्दंत,संभाजी ब्रिगेड तालुका सचिव पुंडलिक लोणकर, मराठा सेवा संघाचे  भागवत इंगळे सर, संभाजी ब्रिगेड नागापूर सर्कल अध्यक्ष शिवश्री हनुमंत जाधव ,मराठा सेवा संघ मिरवट शाखा अध्यक्ष अशोक इंगळे, युवक नेते भागवत काकडे, अशोक शिंदे ,अर्जुन चाटे नागनाथ शिंदे ,नितीन राठोड, सचिन राठोड, अनिल जायभाये
यासह अनेक पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते बैठकीतील सर्वांनी नवनिर्वाचित संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज यांच्यासह नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस अभिनंदन करून सदिच्छा दिल्या .

No comments:

Post a comment