तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 September 2020

सेनगांवात जिल्हा मध्यवर्ती बँकेतुन खातेदाराच्या परस्पर पैसे उचलले,शाखाधिका-यासह दोघावर सेनगांव पोलीसात गुन्हा दाखल


हिंगोली प्रतिनीधी
दि.०६,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव येथील परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती शाखा सेनगांव बँकेतुन एका खातेदाराच्या परस्पर खोटे दस्ताऐवज व बनावट स्वाक्षरी करुन १ लाख ७ हजार रुपये उचलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने याप्रकरणी सेनगांव शाखेच्या शाखाधिका-यासह दोघावर सेनगांव पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.

सेनगांव तालुक्यातील जामदया येथील शेतकरी बाजीराव दादाराव पोले यांनी परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सेनगांव मध्ये सन २०१३ मध्ये खाते उघडल्या नंतर नेहमी या बँकेतुन आर्थिक व्यवहार करत होते.दि.२९ एप्रिल २०२० रोजी बँक खात्यात ३ लाख ७४ हजार ८५५ रुपये जमा होते परंतु कोरोना या महाभयंकर रोगामुळे लाँकडाऊन असल्यामुळे पासबुक अद्यावत करण्यात आले नाही.पोले हे ५ आँगस्टला बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांच्या खाते क्रमांक ००३२११००२००५६७६ मधुन १ लाख ७ हजार रुपये कमी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर पोले यांनी बँकेकडून रितसर संगणीकृत खाते उतारा घेतला असता जामदया येथील लक्ष्मण नामदेव शेळके या नावाच्या व्यक्तीने बँकेसोबत संगणमत करुन दि.२३ एप्रिल रोजी ३० हजार रुपये,दि.८ मे रोजी २० हजार रुपये,दि.०३ जुनला ५० हजार रुपये,दि.१० जुनला ४ हजार रुपये,दि.०१ जुलैला ३ हजार रुपये असे एकुण १ लाख ७ हजार रुपये बनावट दस्ताऐवज व बनावट स्वाक्षऱ्याच्या आधारे रक्कमेची उचल करुन फसवणूक केली या प्रकरणाची सखोल चौकशी करुन बँक खात्यातून परस्पर १ लाख ७ हजार रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी संबधीतावर फौजदारी कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी बाजीराव पोले यांनी हिंगोली जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना केली होती.याप्रकरणी सेनगांव पोलीस स्टेशनला बाजीराव दादाराव पोले यांच्या फिर्यादीवरून लक्ष्मण नामदेव शेळके रा.जामदया ता.सेनगांव,सेनगांव शाखेचे शाखाधिकारी पारीसकर,सेनगांव शाखेचे रोखपाल या तिघावर गु.र.नं.२९३/२०२० कलम ४०९,४२०,४६८,४७१,३४ भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सेनगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकुर हे करीत आहेत.


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment