तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 September 2020

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दादर प्रभादेवी विभागाचे उपाध्यक्ष नितीन लाड यांनी कलाकारांना दिला एक हात मदतीचा


(मुंबई प्रतिनिधी)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दादर प्रभादेवी विभागाचे उपाध्यक्ष नितीन लाड यांनी श्री शिवाजी मंदिर आणि मुंबई येथील इतर नाट्यगृहाच्या  सर्व रंगकर्मींना
अन्नधान्य किटचे मदत वाटप केले.या वेळी नाट्य व्यवस्थापक संघाचे सचिव हरी पाटणकर , शेखर दाते, प्रवीण दळवी, नितीन नाईक, आणि इतर रंगकर्मी  उपस्थित होते.या प्रसंगी एक रंगमच असो किंवा इतर कोणतेहीत क्षेत्र असो सर्व गरजुनां सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून मदतीचा हात देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणारे कार्यकर्ते कसे असावेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे   दादर विभागातील मनसेचे नेते उपाध्यक्ष नितीन लाड! दिवस रात्र कधीही एका हाकेवर सतत धडपड करणारे , पडेल ते काम करणारे , आणि नेहमी दिलेल्या आश्वासनाची पुर्ती करणारे असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे नेते  " नितिन लाड " साहेब तुमच्या कार्याला मानाचा मुजरा ! अशा शब्दात सचिव हरी पाटणकर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच या प्रसंगी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनच्या काळात आणि सध्याच्या कठीण परिस्थितीत रंगकर्मीनां खूप त्रास सहन करावा लागला. या कठीण परिस्थितीत आर्थिक संकटाशी सामना करण्यासाठी लवकरच नाट्यगृह, रंगभूमी पुन्हा एकदा जोमाने सुरू होऊ देत अशी मनसेचे नितीन लाड यांनी ईश्वर चरणी प्रार्थना केली आणि रंगकर्मींना दिलासा दिला. शेवटी नाट्य बुकिंग क्लार्क संघाचे सचिव हरी पाटणकर यांनी मनसेचे नेते नितीन लाड आणि सर्व उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.

No comments:

Post a comment