तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 6 September 2020

न्यायाच्या मागणीसाठी उपोषणास बसू आणि मोर्चा देखील काढू ; गोरसेनेचा इशारा

सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ५ _ दि. ७ जून २०२० रोजी गेवराई तालुक्यातील मारफळा शिवारातील शेतामध्ये पाईप लाईनचे काम सुरु असतांना साहेबराव रूपा राठोड नामक व्यक्तीवर जेसीबी वाहन अंगावर गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्त्यु झाला होता. कृषी खात्यामधील स्व. गोपीनाथराव मुंडे अपघात योजने अंतर्गत फाईल दाखल करण्यासाठी सातबारा, फेरफार लागत आहे. ऑनलाईन सातबारावर साहेबा रूपा डोंगरे हे नाव ऑनलाईन करणाऱ्याच्या चुकीमुळे झालेले आहे, साहेबा  रूपा डोंगरे या नावाच्या फेरफार वर त्यांचे खरे नाव साहेबराव रूपा राठोड हे आहे वारंवार नाव दुरुस्तीसाठी तलाठी साहेबाना बोलून सुद्धा कामाची दिरंगाई करत आहे.
    अपघात योजनेसाठी दिलेली मुदत दि. 07/09/2020 आहे तरी तहसीलदार साहेबांनी दोन दिवसात नाव दुरुस्त करून द्यावे, सदर परिस्थिती ही प्रशासकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे झालेले आहे, जर अपघात विमा योजनेचा सदर व्यक्तीस लाभ मिळाला नाही तर त्यास तहसील, प्रशासन जीम्मेदार असेल, विमा योजने मध्ये होणारा शेतकरी फायदा जर सदर लाभार्थ्यास मिळाला नाही तर दि. 10/09/2020 रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणास बसू व गोरसेना गेवराई तालुका वतीने तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढू असा इशारा देण्यात येऊन मागणीचे निवेदन तालुका प्रमुख सतीश पवार, तालुका सचिव संजय राठोड, तालुका सहसंघटक अण्णासाहेब चव्हाण, शहर प्रमुख संदीप राठोड, मनोज राठोड, संतोष पवार आदींनी दिले आहे.

╭══════════
  सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
══════════════╯

No comments:

Post a comment