तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 September 2020

सर्जेराव तात्या तांदळे यांच्या निवडी बद्दल रायमोहात आनंदोत्सव साजरा- भाजपा नेते गोकुळ सानप


रायमोहा(प्रतिनिधी) :- लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे सच्चे सैनिक व माजी मंञी पंकजाताई मुंडे खासदार प्रितमताई मुंडे यांचे विश्वासू खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले सर्जेराव तात्या तांदळे यांची भाजपा बीड  जिल्हासरचिटणीसपदी तिस-यांदा निवड करण्यात आली आहे तर जिल्हा सचिव म्हणून राजेंद्र आण्णा बांगर तर जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून चंद्रकांत बप्पा फड तसेच भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्षपदी निळकंठ भाऊ चाटे यांची निवड झाल्याबद्दल रायमोहा पंचायत समिती गणात भाजपा विद्यार्थी आघाडीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा सर्जेराव तात्या तांदळे यांचे खंदे समर्थक म्हणून बीड जिल्ह्यात ओळख असलेले गोकुळ सानप यांनी व मिञ परिवाराने तोफा उडवून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला बोलताना गोकुळ सानप म्हणाले की तांदळे , बांगर , चाटे , फड यांच्या निवडीने कार्यकर्त्यात आनंद संचारला आहे व या मुंडे भगिनींनी केलेल्या निवडी योग्य असून झालेल्या निवडीत गोरगरीब कार्यकर्त्यांची पाठराखण करणारे शिलेदार निवडल्याने मनस्वी आनंद झाला असल्याचे रायमोहा पंचायत समिती गणाचे भाजपा नेते गोकुळ सानप म्हणाले तांदळे , बांगर , चाटे , फड यांच्या निवडीबद्दल रायमोहा बाजारतळ येथे तोफा वाजवून पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला व लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे अमर रहे पंकजाताई साहेब मुंडे खासदार प्रितमताई मुंडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाने कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला या आनंदोत्सव प्रसंगी रायमोहा बारा वाड्या परिसरातील भाजपाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a comment