तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 September 2020

संतांच्या नावाचा वापर करणाऱ्या कंपणीवर कारवाई करण्याची वारकरी महामंडळाची मागणी....गोरख पवार वैजापुर औरंगाबाद

वारकरी संप्रदायाचे काळीज असणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या नावावर नुकतेच एका कंपणीने बिडीचे उत्पादन सुरू केले असून यामुळे करोडो वारकऱ्यांची आस्था व भावना दुखवने व कंलकीत करण्याचा प्रयत्न करणार्या संभाजी बिडी, शिवाजी बिडी व तंबाखू जन्य व्यसनावर संताचे तसेच महापुरूषाचें नाव छापणाऱ्या कंपणीवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी गुरूवारी युवा वारकरी महामंडळाच्या वतीने औरंगाबाद जिल्हा अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे व
या घटनेचा युवा वारकरी महामंडळ संभाजीनगर यांनी जाहीर निषेध गुरूवारी जिल्हा अधिकारी कार्यालय येथे केला आहे. यावेळी  युवा वारकरी महामंडळाचे औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष निवृत्ती महाराज वाडेकर यांनी औरंगाबाद  जिल्ह्यात  जिल्हाधिकाऱ्यांना व तालुका ठिकाणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन पुढील कारवाई करण्याची मागणी केल्याचे जिल्हा अध्यक्ष निवृत्ती महाराज वाडेकर यांनी सांगितले याप्रसंगी कार्याध्यक्ष सुंदर महाराज काळे प्रचारक, औरंगाबाद तालुक्याचे कार्याध्यक्ष लक्ष्मण महाराज वाघ, गणेश महाराज देवकर, औरंगाबाद तालुक्याचे कोषाध्यक्ष ऋषिकेश महाराज तरासे, प्रसिद्धीप्रमुख सागर देवकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a comment