तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 September 2020

दासोपंतांची पासोडी' जतन करण्यासाठी अंबाजोगाईत उभे राहणार 'पासोडी भवन'

देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांनी गौरविलेली 'पासोडी';भुमीपुजनाचा बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना बहुमान

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
       मराठी साहित्य विश्वातील अनमोल ठेवा 'दासोपंतांची पासोडी' जतन करण्यासाठी अंबाजोगाईत  'पासोडी भवन'उभे राहणार आहे. दासोपंतांची पंचीकरण ‘पासोडी हा अनमोल ठेवा आहे. चाळीस फूट लांब आणि चार फूट रुंद अशा कापडावर पंचीकरण, अध्यात्मज्ञानाचा विषय चित्राकृतींतून मांडलेली पासोडी मराठी संतवाङमयात अनन्य, अपूर्व व एकमेवाद्वितीय आहे.देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांनी स्वत: येऊन पहाणी केलेल्या व गौरविलेल्या 'पासोडी' च्या जतनासाठी उभे राहणार्या या भवनाच्या भुमीपुजनाचा बहुमान परळीचे माजी नगराध्यक्ष  बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना मिळाला.
          पंधराव्या शतकातील थोर संत सर्वज्ञ दासोपंत यांच्या सृजनाने अविष्करलेली "पासोडी" म्हणजे मराठी साहित्य विश्वातील अनमोल ठेवा.भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी स्वतः "पासोडी" पहिली होती आणि राष्ट्रपती भवनद्वारा काचेची पेटी भेट दिली होती.सध्या "मराठी साहित्यविश्वातील हे महावस्त्र पाचोडी" जीर्ण अवस्थेत आहे.हा ठेवा जतन करण्यासाठी सर्वज्ञ दासोपंत अभ्यास मंडळ, अंबेजोगाई सातत्याने प्रयत्नशील असते. नुकतेच विश्वस्थ मंडळाने "पासोडी भवन"निर्माण करण्याचचे ठरविले आहे. सर्वज्ञ दासोपंतांच्या जन्मतिथी दिवशी "पासोडी भवन" चे भूमीपूजन परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.विधीवत पुजा करुन या भवनाचे भुमीपुजन करण्यात आले. कोरोनामुळे छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गुरुमाय,नगरसेवक डॉ.अतुल देशपांडे, दत्तप्रसाद रांदड, मकरंद पत्की,अरुणराव देशपांडे, राहुल देशपांडे,शैलेश गोस्वामी,राजेश गोस्वामी आदींसह दासोपंत विश्वस्थ मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
             सर्वज्ञ दासोपंत यांच्या पासोडी भवन भुमीपुजनाचा सन्मान दासोपंत विश्वस्थ मंडळाने आपणांस दिला हा आपल्या आयुष्यातील परमभाग्याचा व  अविस्मरणीय क्षण असून राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे साहेब यांच्या सहकार्याने सर्वज्ञ दासोपंतांच्या जन्मभूमीचे आणि कर्मभूमीचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले.

No comments:

Post a comment