तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 6 September 2020

शेतकर्‍यांच्या खरीप पिकांसाठी जायकवाडीचे पाणी दोन्ही कालव्यांद्वारे सोडा -आ.डॉ. रत्नाकरराव गुट्टे


अरुणा शर्मा


पालम :- जायकवाडी धरण पूर्णपणे भरल्यामुळं धरणातून गोदावरीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. मात्र हे पाणी जायकवाडीच्या देान्ही कालव्याद्वारे शेतकर्‍यांच्या पिकासाठी मोफत देण्यात यावे अशी मागणी गंगाखेडचे आमदार डाँ. रत्नाकरकराव गुट्टे यांनी जिल्हाधिकारी परभणी आणि अधिक्षक अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केलीय.
जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांची खरिप पिेके पावसाने उघडीप दिल्याने धोक्यात आले असून जायकवाडी धरण सध्या पूर्णपणे भरले आहे. जायकवाडीतून  उवज्या कालव्या पाठोपाठ गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. जलविद्युत केद्राच्या माध्यमातून गोदेावरीपात्रात 15.89 क्युसेक्स पाण्याच विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडीच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या खरीप पिकांना पावसाने उघडीप दिल्याने ही पिके धोक्यात आली आहेत त्यामुळे जायकवाउच्या उजवा आणि डावा दोन्ही कालव्यातून शेतकर्‍यांच्या पिकांसाठी हे पाणी सोडण्यात यावे त्याच बरोबर या पाण्यासाठी शेतकर्‍यांकडून कोणतीही पाणीपट्टी वसूल करु नये अशी मागणी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केली आहे सध्या जायकवाडीच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांची पिके जगविणे महत्वाचे असून गोदावरीत पाणी सोडण्यापेक्षा दोन्ही कालव्यांद्वारे शेतकर्‍यांच्या पिकांना पाणी देवून त्यांची खरीपाची पिके तारावीत अशी मागणीही आमदार रत्नाकरराव  गुट्टे यांनी जिलहाधिकारी परभणी  व जायकवाडीचे अधिक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. तसेच पालम, पुर्णा येथील आमदार रत्नाकर गुट्टे मित्रमंडळ व रासपच्या वतीने रासपचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट संदिप अळनुरे, मित्र मंडळाचे विधानसभा संघटक राम लटके, पालम पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, तालुका अध्यक्ष नारायण दुधाटे, जिल्हा सरचिटणीस गणेश घोरपडे, शहराध्यक्ष असदखाँ पठाण, दत्तराव घोरपडे, विजयकुमार शिंदे, शेख गौस, बाळासाहेब कुरे, तायरखाँ पठाण भगवान शिरस्कर, गणेश दुधाटे पूर्ण चे तालुकाध्यक्ष गणेश कदम, नवनाथ भुसारे, बापूराव डुकरे, गजानन माने, जुनेद कादरी, जगनाथ रेनगडे, बंडू पवार, गणेशराव गाढवे, नागेश एंगडे, रवी वाघमारे, हारी सुर्यवंशी आदींनी केली आहे.

No comments:

Post a comment