तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 September 2020

राज्यातील मातंग समाजातील बँन्ड कलाकारांना आर्थिक मदत देण्याची युवासेनेची मागणी

सेनगांव/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
सहा महिन्यापासून राज्यात कोरोना महामारीचे संकट कायम असून या महामारी काळात मातंग समाजातील बँड कलाकार बेरोजगार झाले असून परिणामी त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे मातंग समाजातील बँड कलाकारांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीचे निवेदन दि.१४ सप्टेंबर सोमवार रोजी युवासेना बहुजन आघाडी कडुन सेनगांव तहसिलदारांना देण्यात आले आहे.

संपुर्ण राज्यात मातंग समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे या समाजातील तरुण लग्नकार्य, शुभप्रसंगी बँड वाजवणे,झाडु बनविणे व त्याची विक्री करणे तसेच विधवा वयोवृद्ध महिला ह्या सदन व्यक्तीच्या घरी कपडे धुणे,भांडी घासणे, स्वयंपाक करणे आदी कामे करतात.परंतु मागील सहा महिन्यापासून राज्यात कोरोना महामारीचे संकट कायम आहे.त्यामुळे या महामारीमुळे मातंग समाजातील पुरुष व महिला पुर्णत: बरोजगार झाले आहेत परीणामी मातंग समाजातील कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.या समाजाकडे उदरनिर्वाह करण्यासाठी दुसरे कोणतेच साधन नाही.तरी महाराष्ट्र सरकारने राज्यातील संबधीत  मातंग समाजात असलेले बँन्ड कलावंत व धुणी,भांडी करणार्‍या महिलांचा सर्वे तात्काळ करावा व त्यांच्याकडे अहलेले जनधन खाते व आधारवर त्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी जेणे करुन बहुजन समाजाची होणारी उपासमार थांबेल या गंभीर मागणीकडे राज्य सरकारने वेळीच लक्ष द्यावे. हे निवेदन प्रतिलीपी मध्ये मा.सामाजिक न्याय विभाग,महाराष्ट्र,मा.सांस्कृतीक कार्यमंत्री,महाराष्ट्र,मा.हिंगोली पालकमंत्री व मा.हिंगोली जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले आहे.यावेळी हिंगोली शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख,युवासेना उपजिल्हाप्रमुख अनिल अगस्ती,युवासेना बहुजन आघाडी सेनगांव तालुकाप्रमुख विलास सुतार,युवासेना सोशल मिडिया तालुकाप्रमुख सचिनभैया जाधव,आकाश इंगळे,कैलास गायकवाड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a comment