तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 September 2020

कोरोना काळात कोविड योद्धा म्हणून शिक्षकांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली; पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडवू - जि. प. गटनेते अजय मुंडेमहाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती शाखा बीडच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण

बीड (प्रतिनिधी दि. 7) - महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती बीड जिल्हा शाखा द्वारा आयोजित राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार वितरण सोहळा २०२० आज बीड येथे पार पडला. बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना या पुरस्काराचे वितरण सन्मान चिन्ह देऊन करण्यात आले. काल झालेल्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांचा बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जि. प. गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते गौरव करून शिक्षक दिनाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शिवकन्याताई शिवाजी सिरसाट, उपाध्यक्ष श्री. बजरंग बप्पा सोनवणे, सभापती श्री. जयसिंग भैय्या सोळंके, सभापती श्री. कल्याण अबुज, सदस्य बालासाहेब शेप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते श्री. शिवाजीराव सिरसाट, गटशिक्षण अधिकारी श्री. अजय बहिर, लालासाहेब तिकडे, बाबासाहेब मस्के, सभापती बाबुराव जाधव व जिल्ह्यातील आदर्श शिक्षक उपस्थित होते.

कोरोना काळातील परिस्थितीत बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी कोविड योद्धा म्हणून आदर्श असेच कार्य केले आहे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण तत्पर असल्याचे मत जिल्हा परिषदेचे गटनेते श्री. अजय मुंडे यांनी व्यक्त केले. भावी पिढी बरोबर समाज घडवणाऱ्या शिक्षकांचे समाजात योगदान खूप मोठे आहे, आजही समाज मनावर शिक्षकांची आदर्श छाप आहे; शिक्षक समाजाचा आरसा असून, भावी पिढी घडवणाऱ्या या हातांचा माझ्या हातून गौरव करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याचेही श्री. मुंडे यावेळी म्हणाले.

No comments:

Post a comment