तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 13 September 2020

शेतकरी तूर पीक प्रशिक्षणाचे आयोजन

 सिरसाळा....
 

आज भिलेगाव येथे राष्ट्रीय कडधान्य विकास कार्यक्रमा अंतर्गत तुर पीक प्रशिक्षनाचे अयोजन करण्यात आले . सदर प्रशिक्षणास महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सागर विर्धे यांच्या शेतामध्ये तूर पिकावर आधारित मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले , तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी तूर पिकाच्या एकात्मिक किड व्यवस्थान व नियंत्रण या विषयी माहिती देताना शेतकर्यांनी कामगंध सापळे लावून त्याचे नियमित निरीक्षण करून किडिवर नियंत्रण मिळवण्यासाठी निम अर्क व योग्य औषधाची फवारणी करावी, उत्पादनातून मिळणाऱ्या तूर  पिकाचे दाळी मधे रूपांतर करण्यासाठी दाळ मिल उभारावी ,महिलांनी एकत्रित येऊन शेतकरी गटा मार्फत दाळ मिल निर्माण करून गावातच उद्योग उभारावेत . पुढे  पर्यवेक्षक चंद्रकांत थोंटे यांनी शेतकऱ्यांना तूर पिकाचे व्यवस्थापन करताना तूर पिकाची शेंडे छाटणी उत्पादन वाढीसाठी आवश्यक आहे , सर्व शेतकऱ्यांनी शेंडे छाटणी करावी , पाने गुंडाळणारी अळी यामुळे नियंत्रणात येते व झाडाची कायिक वाढ थांबून उत्पादनात भर पडते , महिला शेतकऱ्यांनी  पुढाकार घेवून नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. शेतकरी कंपन्या गावातच स्थापन करून नवीन उद्योग उभारावेत . कार्यक्रमाला महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या , उपस्थित शेतकऱ्यांना कृषी दैनंदिनी चे वाटप करण्यात आले.  यावेळी मंडळ कृषी अधिकारी एम . बी . कवडे , कृषी सहायक वाय. एम. हाडबे , उपसरपंच बालाजी कडभाने ,सागर विरधे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मुक्तेश्वर कडभाणे यांनी केले.

No comments:

Post a comment