तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 September 2020

पालम शहरातील मुख्य चौकते तळया पर्यंत जाणारा मार्ग लवकरात लवकर दुरुस्त करा


सलमान खान मित्र मंडळाची मागणी


अरुणा शर्मा


  पालम :- शहरातील मुख्य चौक ते तळयाकडे जाणारा मार्ग अतीशय खराब झालेला आहे. शहरातील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी अतीशय कसरत करावी लागत आहे जागो जागी रस्त्यावर खड्डे झालेले असून पावसामुळे चिखलच चिखल झाला आहे. वाहणांचे तेथे वारंवार अपघात होत आहेत त्यामुळे जिवीतास धोका निर्माण झाला आहे. 
वारंवार निवेदने देऊन देखील निवेदनाची दखल घेतली जात नाही. त्यामुळे लवकरात लवकर सदरील रस्त्याचे काम चालु नाही केल्यास सलमान खान मित्र मंडळाच्या वतीने शहरातील मुख्य चौक ते तळयापर्यंत जाणारया मार्गावर ज्या-ज्या ठिकाणी खड्डे पडले त्या-त्या ठिकाणी बेसरमाचे झाड लावू असे निवेदन दिनांक 15 सप्टेंबर रोजी सलमान खान मित्र मंडळाच्या वतीने पालम तहसिल येथे देण्यात आले. या निवेदना वर मित्र मंडळाचे संस्थापक सलमान खान पठाण यांच्या स्वाक्षरया असून या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी परभणी, बाधकाम विभाग गंगाखेड यांना पाठवण्यात आले आहे.

No comments:

Post a comment