तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 September 2020

डी के पवार व रंजना डोंगरे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित


सोनपेठ तालुक्यातील दोन वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या सहशिक्षिकांचा लायन्स क्लब कडुन सन्मान


सोनपेठ/ तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी 

तालुक्यातील वानिसंगम येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे सहशिक्षक डी के पवार व शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेतील सहशिक्षिका रंजना डोंगरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

शनिवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब परभणी च्या वतीने हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

परभणी शहरातील निरज हाॅटेल च्या सभागृहात हा सन्मान सोहळा पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब चे अध्यक्ष शिवकुमार पुरे हे होते तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा शिक्षण अधिकारी डाॅ.सुचिता नाटेकर, अमोल ढाकणे,शैलेश मल्होत्रा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार वितरित करण्यात आले.

तालुक्यातील वानिसंगम च्या शाळेचे शैक्षणिक कार्य व येथील शिक्षक डी के पवार यांनी सातत्याने राबवलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या वेगवेगळ्या उपक्रमांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

डी के पवार यांना यापूर्वी सुध्दा वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत.

सोनपेठ तालुक्याला ज्ञानपेठ बनवण्यासाठी पवार सतत नवनवीन प्रयोग करत असतात.

त्यांनी तालुक्यात केलेल्या ई-लर्निंग च्या कामामुळे त्यांना तंत्रस्नेही पुरस्कार सुध्दा मिळालेला आहे.

ऑनलाईन शिक्षणासाठीची त्यांची तळमळ बघुन इतर शिक्षकांनी सुध्दा प्रेरित होऊन ऑनलाईन शिक्षणासाठी प्रयत्न चालु केले आहेत.

तर जिल्हा परिषद कन्या शाळेच्या सहशिक्षिका रंजना डोंगरे यांनी झुम च्या माध्यमातून होणा-या ऑनलाईन बैठकीची तालुक्यात सुरवात केली आहे. रंजना डोंगरे या शालेय विद्यार्थ्यांना शिकवित असलेल्या पध्दतीमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

दोघांनाही मिळालेल्या या पुरस्कारामुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, तालुका शिक्षणअधिकारी शौकत पठाण, उच्चश्रेणी मुख्याध्यापक प्रदिप गायकवाड,मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष राजकुमार धबडे,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश पाटील,सुभाष सुरवसे,डाॅ.संतोष रणखांब,सुकेश यादव,सुनिता जोशी,अमर गायकवाड, कालिदास कुलकर्णी, यांच्यासह इतर वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .

No comments:

Post a comment