तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 September 2020

गावातील रहदारीच्या रस्त्यावरील अतिक्रमण नागरिकांनी स्वयंम स्फूर्तीने स्वता काढावे-प्रशासक कु. गवळी

फुलचंद भगत/मंगरुळपीर
वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत म्हणून ओळख असलेल्या १७ सभासदाच्या  अनसिंग ग्राम पंचायत मध्ये  प्रशासक म्हणून रुजू झालेल्या वाशिम येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी कु.प्रियंका गवळी यांनी अनसिंग येथील रस्त्याच्या कडेला झालेल्या अतिक्रमानामुळे नागरिकांना ये- जा करण्याकरिता होत असलेल्या त्रासाला लक्ष्यात घेऊन आज थेट स्थानिक  पोलीस प्रशासनाची मदत घेऊन अतिक्रमण काढण्याचे काम हाथी घेतले. असून ही अतिक्रमण मोहिम आता नियमित राहणार असून ग्राम पंचायत अंतर्गत सर्व व्यापारी व नागरिकांना आवाहन करण्यात आले की आप लापल्या दुकाना बाहेरील अतिक्रमण स्वता काडून घ्यावे अन्यथा ग्राम पंचायत कडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासक कु.प्रियंका गवळी यांनी दिला  आहे,तर नागरिकांनी आपापली अतिक्रमण स्वयंम स्फूर्तीने स्वतः काढुन घ्यावी असे आवाहन या वेळी प्रशासक  कु.गवळी यांनी केले आहे.या अतिक्रमण मोहीम मध्ये स्थानिक पोलीस कर्मचारी व ग्राम सेवक बोडके यांचा सहभाग होता.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a comment