तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 September 2020

सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा बन या भागात मुसळधार पाऊस सोयाबीन कापूस पिकांचे मोठें नुकसान

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसा पासून मुसळधार पाऊस पडत आहें सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा बोरखेडि बन कापडशिंगि या भागात आज दुपारी एक वाजताच्या सुमारास विजेच्याककडासह मुसळधार पाऊस पडला आहें त्यामुळे शेतकरी पुन्हां मोठ्या संकटात पडला आहेत सोयाबीन पिकांमधे पाणी साचले आहें यात आधीच कोरोना रोगाने नागरिक त्रस्त आहेत शेती माल कवडी मोल भावाने विकला जात आहें आणि त्यातच सोयाबीन पिकावर देखिल  करपा रोगाचा प्रादुर्भाव आणि  कोड अळी शेड अळी सोयाबीन पिवळ्या पडून वाळून जात आहेत आत्ता ह्या दोनदा जालेल्या अतिवृष्टीमुळे  व सोयाबीनच्या दुबार पेरणी मुळे शेतकरी खचला आहें आत्ता जी सोयाबीन पिके हाती येणार आहेत ती पण आडवी पडली आहेत शेतकरी चिंताग्रस्त जाला आहें मात्र अद्याप कोणतेही प्रशासकिय अधिकारी पंचनामे करण्यासाठी आले नाहीत हिवरखेडा येथील शेतकऱ्यांनी सेनगाव येथील तहसीलदार जीवन कुमार कांबळे यांच्या कडे तातडीने पंचनामे करणासाठी निवेदन देण्यात आले होते दि 10/09/2020 रोजी सेनगाव तहसीलला निवेदन देण्यात आले होते व कृषी विभाग सेनगाव यांना देखिल निवेदन देण्यात आले होते मात्र अद्याप हि पिकांचे कोणतेही अधिकारी पाहणी करणासाठी आले नाहीत उद्या हिंगोली जिल्हाच्या पालकमंत्री व शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य ह्या हिंगोली दौऱ्यावर येत आहेत पालकमंत्री यांनी जिल्ह्यात जालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणांत नुकसान जाले आहें त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे

No comments:

Post a comment