तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 September 2020

महात्मा जोतिबा फुले समता परिषदेच्या वतीने कांदिवली पूर्व येथे रक्तदान शिबिर संपन्न

(मुंबई प्रतिनिधी)
सध्याच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरील परिस्थिती मध्ये रूग्णानां रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रूग्णांना वेळेवर रक्त पुरवठा करण्यासाठी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून दि.13/9/2020 रविवार रोजी मा.सदानंद मंडलिक (मुंबई अध्यक्ष) यांच्या आदेशानुसार महात्मा जोतिबा फुले समता परिषद कांदिवली (पूर्व) तालुका  यांच्या वतीने शगुण हॉल, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, कांदिवली (पूर्व) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन जे जे महानगर रक्तपेढीच्या सहकार्याने मा.दिपक सोनकांबळे(तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस) यांनी केले होते.या प्रसंगी प्रमुख पाहुणे मा.डॉ.होलमुखे 
(जिल्हा निरीक्षक ),प्रा.गणेश कांबळे (विश्वस्त- भारत माता शाळा)
मा.किरण मोरे(युवक जिल्हा अध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
मा.सुभाष नेहरकर(जिल्हा सचिव)
मा.संजय इरकल(युवक जिल्हा उपाध्यक्ष - उत्तर  मुंबई जिल्हा) आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी रक्तदान केल्यानंतर सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले ‌. तसेच डॉ. होलमुखे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे मार्गदर्शक मा.किरण मोरे (जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस) आणि आयोजक मा.दिपक सोनकांबळे यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
 सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून हा रक्तदान शिबिराचा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी सहकार्य करणाऱ्या रक्तदात्यांचे , जे जे महानगर रक्तपेढीचे , आणि सर्व मान्यवरांचे रक्तदान शिबिराचे आयोजक दिपक सोनकांबळे यांनी मनःपुर्वक आभार मानले.

No comments:

Post a comment