तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 September 2020

गजानन वानखडे यांच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची

औरंगाबाद (प्रतिनिधी) :- गजानन बापूराव वानखडे रा.भटोरी ता.जि. अकोला याला अत्यंत गंभीर आणि दुर्धर आजाराने ग्रासले असून त्याला उच्च प्रतीच्या आणि महागड्या उपचाराची नितांत आवश्यकता असल्याने त्याला आर्थिक मदतीचे आवाहन गेट वेल सुन गजू व्हाट्सअप या त्याच्या जिवाभावाची मैत्री असलेल्या ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आले आहे, गजानन वानखडे या संशोधक विद्यार्थ्यांने औरंगाबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालय व महितीशास्त्र विभागात एम.फील. पदवी उत्तीर्ण केली, वानखडे हा संशोधक विद्यार्थी ज्याने शिक्षण घेण्यासाठी उपाशीपोटी राहून दिवस काढले, कमवा शिका योजनेतून आपला उदरनिर्वाह केला, शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द उराशी बाळगली, अत्यंत हुशार, मनमिळावू, शांत, अभ्यासू, सहनशील आणि सतत संघर्षशील राहून दुसऱ्यांच्या दुखात सहभागी होत मदतीला धावून जाणार मित्र म्हणून त्याची ओळख आहे, मात्र आज त्या जीवघेण्या आजाराशी लढा देत, अंथरुणावर खिळून आहे, परंतु निसर्गाच्या पुढे माणसाला नतमस्तक व्हावच लागतं हेही तेव्हढच खरं! आज वानखडे यांच हृदय निकामी झालं आहे, सर्वसामान्य व्यक्तीच हृदय पासष्ट टक्के काम करतं परंतु यांचं हृदय केवळ पंधरा टक्केच काम करत असल्यामुळे त्यांचे आजारपण वाढत आहे,त्यांना लवकरात लवकर मुंबई येथे केईएम रुग्णालयात भरती करायचे आहे, पण त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्याला तिथे जाण्याचा खर्चसुद्धा परवडण्यासारखा नाही तरी त्याच्या पुढील उपचारासाठी गेटवेलसुन या व्हाट्सअप ग्रुपच्या मित्र परिवाराने दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्था यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे,कारण त्याच्या उपचारासाठी आणि औषधासाठी फार मोठ्या प्रमाणात पैशांची गरज  भासणार आहे, याकरिता आपण सामाजिक बांधिलकी म्हणून राजकीय नेते,पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती, व सर्व स्तरातील लोकांनी आपल्या स्वेच्छेने आर्थिक मदत करावी असे आवाहन प्रा. सुभाष जोगदंडे, प्रा.शिलवंत गोपणारायन,  कारण गजानन वानखडे हे एकमेव त्यांच्या आईवडिलांचा आधार आहेत, त्याचे आईवडीलांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची आहे,आपण केलेल्या मदतीने त्यांना आधार मिळेल व योग्य वेळी उपचार होण्यासाठी मदत होईल.मदती करीता त्यांचे खाते क्रमांक 60050536862, आयएफएसी कोड MAHB0000152 बँक ऑफ महाराष्ट्र विद्यापीठ शाखा, औरंगाबाद,असा आहे.

No comments:

Post a comment