तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 September 2020

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण,ट्विटद्वारे स्वत: दिली माहिती, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करण्याचे केले आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोना पाॅझिटिव्ह

(मुंबई प्रतिनिधी)
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. किशोरी पेडणेकर यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. त्या घरीच विलिगीकरणात राहणार आहेत. किशोरी पेडणेकर यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आहे? “मी कोविड अँटिजन चाचणी करुन घेतली. ती सकारात्मक आली. कोणतीही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलिगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांनी चाचणी करून घ्यावी, तसेच काळजी घ्यावी. माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन.” अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

No comments:

Post a comment