तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 September 2020

परळी शहरात पाच दिवसाला सोडण्यात येणारे पाणी आता तीन दिवसाला सोडा-अश्विन मोगरकर


परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तालुक्यातील नागापूर धरणात गुरुवारी सकाळी 71 टक्के उपयुक्त पाणी साठा झाला आहे, त्यामुळे परळीकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे या वर्षी पर्जन्यमान चांगले असल्याने नागापूर धरण पूर्ण क्षमतेने लवकरच भरेल. परंतू भर पावसाळ्यात ही परळी नगर परिषदेमार्फत शहरात 5 दिवसाला एकदा नळ योजने द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे , काही भागात तर 6 दिवसाला पाणी येत आहे त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी धावपळ होत आहे, असे भाजपाचे कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी म्हटले आहे. शहरात सध्या कोरोना रोगाने धुमाकूळ घातला आहे. वैयक्तीक स्वच्छतेसाठी पाण्याची अतिरिक्त आवश्यकता असतानाच धरणात पाणी असूनही या कडे नप पदाधिकाऱ्यांचे व नगरसेवकांचे दुर्लक्ष होत आहे व शहरात केली जाणारी कृत्रिम पाणी टंचाईच आहे असा आरोप ही त्यांनी केला आहे . राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकातील मुख्य जलवाहिनी वारंवार गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जात असते. शहरातील काही भागातील बोअर ही नप च्या दुर्लक्षा मुळे बंद आहेत. पाणीपुरवठा 6 दिवसाला होत असल्यामुळे गल्लीबोळातील बोअर चालू राहिल्याने परळी नप वर पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विद्युत बिलाचा अतिरिक्त खर्च वाढत आहे. 
कोट्यवधी रुपयांची पाणीपुरवठा योजना राबवूनही व नागापूर धरणात मुबलक पाणीसाठा असूनही जनतेला मात्र पाण्यासाठी आठवडा भर वाट पहावी लागत आहे.
परळी शहराला केला जाणारा पाणी पुरवठा निदान तीन दिवसाला करावा अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे.
परळी शहराचा पाणी पुरवठा तीन दिवसाला करण्यासाठीचे निवेदन परळी नप चे मुख्याधिकारी व पाणी पुरवठा सभापती यांना ऑनलाईन पाठवण्यात आले आहे.

No comments:

Post a comment