तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 September 2020

आंतरजिल्हा वाहतुक करताना ट्राव्हेल्स खाजगीप्रवासी बसेसकरीता कार्यपध्दती जाहीर


परभणी, दि. 4 :- आंतरजिल्हा वाहतुक करताना खाजगी प्रवासी बसेस यांनी अंमलात आणावयाची मानव कार्यपध्दतीन जाहीर करण्यात आली असून खाजगी प्रवासी बस ऑपरेटरने कोव्हिड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने आणि परिवहन विभागाने निर्गमित केलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे. असे आवाहन परभणीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम,1989 च्या नियम 20(1)(×) मधील तरतुरदीनूसार लोकसेवा वाहनाच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक दिवशी व फेरीअंती प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे. आरक्षण कक्षात स्वच्छता करावी. कर्तव्यावर असताना मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. बस उभा राहत असलेल्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.  मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देवू नये. बसच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ठेवण्यात यावे. बसमध्ये प्रवाशांच्या वापरासाठी काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावेत. प्रवाशांची प्रवेशाच्यावेळी थर्मल गनद्वारे तपासणी करावी व एखाद्या प्रवाशास ताप, सर्दी आणि खोकला इत्यादी प्रकारची कोव्हिड-19 आजाराची प्राथमिक लक्षणे दिसत असल्यास त्यांना प्रवास करण्यास प्रतिबंध करावा. कंत्राटी बस वाहनामध्ये प्रवासी एका आड एक पध्दतीने आसनस्थ होतील अशाप्रकारे प्रवासी वाहतुकीस परवानगी आहे. स्लिपर बस वाहनांमध्ये डबल बर्थ वर एक प्रवासी तसेच स्वतंत्र सिंगल बर्थवर एक प्रवासी याप्रमाणेच वाहतुकीस परवानगी असेल. चालकाने प्रवासादरम्यान अल्पोपहार व प्रसाधनगृहाचा वापर या कारणाकरीता बस थांबविताना ही ठिकाणे स्वच्छ आहेत याची खात्री करावी. बसमध्ये चढताना व उतरताना नेहमीच शारिरीक अंतर पाळण्याची दक्षता बाळगावी. प्रवाशांना बसमध्ये कचरा फेकू देवू नये तसेच त्यांना कचराकुंडीचा वापर व स्वच्छता राखण्याची सुचना द्यावी. बसचे निर्जंतूकीकरण करणे तसेच अभिलेखे ठेवणे याची जबाबदारी परवानाधारकांची राहील. सुचनांचे पालन न केल्यास परवानाधारकाविरुध्द मोटार वाहन अधिनियम,1988 केंद्रीय मोटार वाहन निय 1989, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनूसार उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी  यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-

No comments:

Post a comment