तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 September 2020

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.शरद पवार यांना महा कला मंडलच्या शिष्टमंडळाने कलाकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन केले सादर

(मुंबई प्रतिनिधी)
मा.शरद पवार यांच्या सोबत महा कला मंडलच्या शिष्टमंडळाची नुकतीच पुणे येथे मिटिंग  झाली. या भेटी मध्ये प्रामुख्याने संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कला प्रकारातील एकत्रित झालेल्या 120 संघटनांची माहिती मा.शरद पवार यांनी घेतली. 
कायमस्वरूपी सर्व कलावंताची  अडचण सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कामगार कल्याण मंडळाच्या धर्तीवर  कलाकार कल्याण मंडळ शासनाने स्थापन करून कलावंतांची अडचणी दूर करण्याचे काम या मंडळामार्फत व्हावे, तसेच सर्व कलावंतांचा आरोग्य विमा शासनाने या मंडळ  मार्फत काढावा, तसेच कलावंत साठी घरकुल योजना, आपत्कालीन तातडीची मदत, विविध कला प्रकारात काम करणाऱ्या कलावंतांची नोंद शासनाकडे व्हावी, अशा विविध मागण्यांचा निर्णय शासनाने ताबडतोब घेण्यासाठी मा.शरद पवार यांनी  या आठवड्यात मा. मुख्यमंत्री,  मा. उपमुख्यमंत्री, मा. सांस्कृतिक मंत्री,  आणि महा कला मंडलचे प्रतिनिधी यांची संयुक्त मिटिंग  लावण्याची सूचना सी. एम ऑफिसला दिली. मा.शरद पवार यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे, महाकला मंडलच्या शिष्टमंडळाला अतिशय आनंद झाला. लवकरच ही मिटींग होईल अशी आशा आहे.या शिष्टमंडळात महा कला मंडल संस्थेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,  कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया,  ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे,  जयमाला काळे इनामदार,  पूजा पवार साळुंखे आदी कलाकार उपस्थित होते .

No comments:

Post a comment