तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 3 September 2020

आता परळी तालुक्यात सुद्धा स्वयंघोषणा पत्रावर मिळणार सर्व दाखले


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
बीड जिल्ह्यात काही तालुक्यात तर राज्यात बऱ्याच जिवल्ह्यात महसूल विभागाकडून  देण्यात येणारे विविध दाखले जसे रहिवाशी, उत्पन्नाचे दाखला, नॉन क्रिमीलीयर, जातीचे दाखला, नजरी नकाशा, अल्पभूधारक प्रमाणपत्र, भुनीहीन प्रमाणपत्र,ओलिताचे प्रमाणपत्र, विहिर असल्याचे प्रमाणपत्र व इतर लागणारे प्रमाणपत्र या पुढे अर्जदाराच्या स्वयंघोषणा पत्रावरच दिले जाणार आहेत. या संदर्भात आज मा तहसीलदार स बिपीन पाटील साहेब यांना तलाठी व मंडळ अधिकारी यांचे तर्फे निवेदन देण्यात आले आहे.सदर निवेदनात  महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचा जी आर दि 09 मार्च 2015 चा हवाला देण्यात आला असून यात उल्लेख केल्याप्रमाणे आता अर्जदार याना तलाठी अगर मंडळ अधिकारी यांचा स्वाक्षरी व अहवाल लागणार नसल्याचे निवेदनात सांगितले आहे. या शासन निर्णयामुळे आता स्वयंघोषणपत्र हेच आधार बनल्याने कोण्ही अर्जदार यांनी खोटी माहिती दिल्यास  स्वतः अर्जदार हाच या साठी जवाबदार असेल. अर्जदार याना शेतु कार्यलयातून या सुविधा उपलब्द होतील. तरी हा  नियम आता परलीतही लागू झाल्याने विदयार्थी व गरजूना याचा नक्किच लाभ होईल. या निवेदनावर मंडळ अधिकारी यु उडते साहेब, एम काळे साहेब, के तांदळे साहेब , गवळी मॅडम, के पवार साहेब तसेच तलाठी संघटनेचे अध्यक्ष गणेश फड  उपाध्यक्ष विष्णू गित्ते, सचिव  अमोल सवईशाम ,तलाठी राजूरे साहेब, युराज सोळंके,सलीम , सतीश भुसेवाढ, संदीप राऊत,  लांजेवार मॅडम,चव्हाण मॅडम, गित्ते मॅडम, सुजाता मॅडम, पलेवाद मॅडम,आदींच्या स्वाक्षरी आहेत.

No comments:

Post a comment