तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 September 2020

येणार काळात मराठा आरक्षण व मराठा समाजाचा इतर मागण्या मान्य झाला नाही तर छावा स्टाईल आंदोलन करू - साईराजे देशमुख


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- येणार काळात मराठा आरक्षण व मराठा समाजाचा इतर मागण्या मान्य झाला नाही  तर छावा स्टाईल आंदोलन करू असा इशारा एका निवेदनाव्दारे छावाचे तालुकाध्यक्ष साईराजे देशमुख यांनी दिला आहे.
                         

    मा तहसीलदार साहेब मार्फत मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देण्यात आले की, मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा, मराठा आरक्षण सुनावणी दरम्यान अंतिम निर्णयासाठी मा.सर्वोच न्यायालयाने हे प्रकरण घटनापिठाकडे पाठवत असताना सद्यस्थितीत SEBC अंतर्गत असलेल्या मराठा आरक्षण स्थगिती केले आहे. यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असून यामुळे मराठा समाजावर अन्याय होत आहे.
     तरी मा.राज्य शासनाने आपल्या कार्यकक्षेत SEBC अंतर्गत आरक्षण पुर्वत करून मराठा समाजाला न्याय द्यावा,त्याचा बरोबर या बाबत सलग पुढील प्रमाणे मागण्या करत आहोत.
१)राज्य मागासवर्ग आयोगाच्या (मा.न्यायमूर्ती गायकवाड आयोग)शिफारस स्वीकारून त्या आधारे मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा व सद्यास्थितीत ओ.बी.सी.मध्ये ज्या ज्या प्रमाणे वेगवेगळ्या वर्ग आहेत उदा.NTA.BC,C,V.J,SBC तशीच एक वेगळी कॅटेगरी तयार.करून मराठा आरक्षण देण्यात यावे.
२)आयोगाच्या शिफारशी स्वीकारून त्या लागू कराव्यात व तसा केंद्र सरकारने कायदा करावा यासाठी प्रयत्न करावेत, तशी केंद्राकडे शिफारस करावी.
३)चालु २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात SEBC शैक्षणिक आरक्षण कायम ठेवावे.
४)येत्या काळात मराठा आरक्षण (SEBC) नसलेली कोणत्याही नोकर भरती करण्यात येछ नये.
५)मराठा क्रांती मोर्चा वेळी मान्य केल्या प्रमाणे तालुका ,जिल्हा व विभाग स्तरावर विद्यार्थीसाठी. तातडीने वसतिगृह सुरू करावे
६)EBC तसेच इतर  योजना अंतर्गत बाकी असलेली फि व स्कॉलरशिप ची शुल्क तात्काळ  अदा करण्यात यावी. शुल्क प्रतिपूर्ती योजना राबून हा भार शासनाने स्वीकारावा अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना छावा स्टाईल ने आंदोलन करील असा इशारा देण्यात आला या वेळी अमर सुरवसे, किरण दळवी, अबंर सारडा,विनायक काकडे, गोपाळ, सुनील गरड,कृष्णा दिवटे, अभिषेक संगेवार, प्रणव स्वामी ,पवनराज गिरी इ.उपस्थित होती.

No comments:

Post a comment