तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 September 2020

पगार यांच्या पाठीशीं जिल्हाभरातील पञकार खंबीरपणे ऊभे!


शनीवारीही एस.पी.ना पञकारांचे निवेदन

फुलचंद भगत/वाशीम 
ता. १२ वाशिम शहर पोलिसांनी पत्रकार नितीन पगारावर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल प्रकरणी दै. विदर्भ मतदार वाशीम आव्रुतीचे संपादक नितीन पगार व मुख्य संपादक एडव्होकेट दिलीप एडतकर ह्यांच्या पाठीशीं जिल्हाभरातील पञकार खंबीरपणे ऊभे राहल्याचे चिञ आहे.शुक्रवारी जिल्हास्थळावरील पञकारांनी दिलेल्या निवेदनापाठोपाठ आता शनीवारीही(ता.१२) जिल्ह्यातील शेकडो पञकारांनी नितीन पगारांवरील दाखल केलेले खंडणीचे खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी वाशीम जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे.
               वाशीम शहर पोलीस स्टेशनमध्ये १० सप्टेंबरच्या राञीला ऊशीरा आलेल्या फिर्यादीची शहानिशा न करता  विदर्भातील अग्रगण्य दैनीक "दैनीक मतदार "चे मुख्य संपादक एडव्होकेट दिलीप एडतकर व वाशीम जिल्हा आव्रूती संपादक नितीन पगार यांच्यावर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहीती ११ सप्टेंबरला कळताच वाशीम जिल्हास्थळावरच्या जेष्ठ पञकारांत तिव्र संतापाची लाट ऊसळली.त्यांनी थेट जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय गाठुन जिल्हा पोलीस अधिक्षकांची ह्या पञकारांच्या शिष्टमंडळांनी भेट घेऊन वाशीम शहर पोलीस स्टेशनमध्ये ह्या प्रकरणाची शहानिशा न करता विदर्भ मतदार चे मुख्य संपादक एडव्होकेट  दिलीप एडतकर व वाशीम  आव्रुती संपादक नितीन पगार ह्यांचेवर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या निदर्शनास आणुण दिले.तसेच ऐक प्रकारे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पञकारीतेची मुस्कटदाबीचा तर हा प्रकार नव्हे ना असा सवाल करून हे दाखल केलेले खंडणीचे खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली.नितीन पगार हे केवळ एका व्रुत्तपञाचे आव्रुती संपादकच नसून श्रमीक पञकार संघ ह्या राज्यातील नामांकीत पञकार संघटनेच्या वाशीम जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्श आहेत.नागरी असो कि ग्रामीण जिल्ह्यातील पञकारांवर होणार्या अन्यायाविरूध्द आवाज ऊठवित असतात.राञ-अपराञ असा काहीही विचार न करता पञकारांच्या पाठीशीं ऊभे राहण्यासाठी धावुन जातात.परीणामी त्यांच्या नेत्तुत्वात जिल्ह्यातील मोठा पञकार वर्ग आहे. सबंधीत माहीती मिळताच पञकारांत तिव्र संतापाची लाट ऊसळुन त्यांनी शनीवारी  दैनीक विदर्भ मतदार वाशीम आव्रुती संपादक नितीन पगार व मुख्य संपादक दिलीप एडतकर ह्यांच्यावर दाखल केलेले खंडणीचे खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी करणारे निवेदन वाशीम जिल्हा पोलीस अधिक्षक यांना सादर केले.सदरहू निवेदनातून त्यांनी दैनिक विदर्भ मतदार ते वाशिम जिल्हा वृत्त संपादक श्री नितीन पगार व विदर्भ मतदार चे मुख्य संपादक एडवोकेट दिलीप एडतकर यांचे विरोधात वाशिम शहर पोलीस ठाण्यात दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी के रात्रीला खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे .लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभ मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार आहे. पत्रकार नितीन पगार यांनी फिर्यादी सोबत आज पर्यंत कधीही कोणत्याही प्रकारचे बोल भाषण केलेले नाही. आणि फिर्यादी सोबत त्यांचा कोणताही संबंध नाही .फिर्यादीने वाशिम शहर पोलीस ठाण्यात केलेल्या खोट्या तक्रारी कोणतीही शहानिशा न करता शहर पोलिसांनी फक्तआकसपणे गुन्हे दाखल केल्याचे दिसून येत आहे .पत्रकार नितीन पगार  हे श्रमिक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. पोलिसांनी आकसपूर्ण पत्रकारावर ते खोटे खंडणीचे गुन्हे दाखल करणे म्हणजे वाशिम जिल्ह्यातील पत्रकार यांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार आहे. पोलिसांनी पोलीस ठाण्यात दिनांक 10 सप्टेंबर 20 रोजी रात्री पत्रकारावर नितीन पगार व संपादक एडवोकेट दिलीपलएडतकर यांच्याविरोधात दाखल केलेल्या खंडणीचा गुन्हा  त्वरित रद्द करण्यात यावा. शिवाय घटनास्थळाचा परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज कव्हरेज, मोबाईल टॉवर लोकेशन शोधून सत्य पडताळून पहावे. अन्यथा या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील पत्रकार बांधव या प्रकरणाची दखल घेतील याची आपण नोंद घ्यावी. अशा प्रकारची निवेदनातुन मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर मालेगाव तालुका अध्यक्ष  अरुण पुरुषोत्‍तम बळी रवींद्र इंगळे मंगरूळपीरचे जेष्ठ पञकार संतोष दिनकरराव काळे ,नंदकिशोर प्रभाकर वनस्कर, गोपाल रमेश व्यास, सुधाकर चौधरी, रिसोडचे सुरेश गिरी, अविष्कार हरिदास शिंपी, अनंत तुळशीराम भालेराव, विठ्ठल नारायण साखरकर ,श्रमिक पत्रकार संघाचे रिसोड तालुका अध्यक्ष दीपक कुदळे ,ज्येष्ठ पत्रकार नागेश धोपे, मालेगावचे अमोल कल्याणकर ,प्रदीप सावले ,प्रकाश कापुरे, प्रकाश भुरे , शिरपुरचेशेख सुलतान , मंगरूळपीरचेअमोल ठाकूर  व| वाशीम चेअनिल गोटे प्रबळ पाटील पौळकर,शेलु बाजारचे संजय राठी विजय राठोड,मंगरुळपीरचे रमेश मुंजे, शेख इरफान संतोष चराटे, मनवर शेख, रिसोडच् महादेव घुगे विवेकानंद ठाकरे, अर्जुन राव खरात ,शाश्वत आंबेकर ,प्रल्हाद कोकाटे ,प्रदीप खंडारे ,रुपेश संजय बाजड, वाशीमचे प्रदीप पट्टेबहादूर, पांडुरंग महाले शितल धांडे यांचेसह अनेक पत्रकारांच्या स्वाक्षऱ्याआहेत.तसेच सबंधीत निवेदनाच्या प्रती वरिष्ठांना पाठविण्यात आल्या आहेत.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a comment