तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 4 September 2020

डॉ.आनंदी सिंह यांना यंदाचा चाणक्य शिक्षाविद् अवार्ड(मुंबई प्रतिनिधी)
"गुरु "चा अर्थ म्हणजे अंधकार नष्ट करणारा, प्रत्येक शिक्षकाची एकच अपेक्षा असते की त्या शिक्षकाचा प्रत्येक विद्यार्थी यशस्वी व्हावा ज्या प्रमाणे सर्व प्रथम शिक्षक लहान मुलांचे अक्षर लेखन सुबक सुंदर करण्यासाठी प्रयत्न करतात त्याच प्रमाणे रचना मॅडम यांची रचना आहे.फन टु लर्न ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी एक प्रसिद्ध संस्था आहे या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा आचार्य चाणक्य शिक्षावेद्  अवार्ड 2020 डॉ.आनंदी सिंह यांना आणि* 650 कर्मठ आणि यशस्वी शिक्षकांना वर्चुअल पध्दतीने प्रदान करण्यात आला या वर्चुअल लाइव पुरस्कार सोहळ्याचे सकाळी 7 ते संध्याकाळी  7 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले होते तसेच हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शिक्षकांच्या नावाची  वर्ल्ड आॅफ रेकॉर्ड बुक मध्ये नोंद करून त्यांना सन्मानित करण्यात आले डॉ.आनंदी सिंह या खाजगी शाळेत गेल्या 28 वर्षापासून कार्यरत आहेत तसेच त्यांना मनापासून वाटते की त्यांच्या प्रमाणे सर्व शिक्षकांना सन्मानित करून फन टु लर्न या संस्थने एक मोठा इतिहास घडवला आहे आमच्या मुंबईतील संस्थेला मानाचा मुजरा! सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या पध्दतीने, माराहाण न करता , न घाबरता न अतिशय आदर पुर्वक शिक्षण दिले पाहिजे, असे त्यांनी मनोगत व्यक्त केले आहे. डॉ.आनंदी सिंह यांना आदर्श शिक्षक पुरस्कार आणि उत्तराखंड शिक्ष असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.तसेच अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले आहे .  तसेच त्यांना 2020 च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा साठी नामांकन मिळाले आहे.या बरोबरच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने मास्कचा   काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढला होता.तेव्हां त्यांनी स्वत:च्या  घरीच मास्क तयार करून गोरं गरिबांना मास्कचे मोफत वाटप केले. त्यानंतर काही दिवसांनी 70 पेक्षा जास्त महिलांनी त्यांना सहकार्य करून हजारो मास्क तयार केले आणि अनाथालय, वृध्दाश्रम , रुग्णालय , झोपडपट्टीतील गरीब गरजू ,बसस्थानकातील असंख्य कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप केले. तसेच त्यांनी सोशल स्पार्क  मदत ,मास्क मोफत वाटप योजने अंतर्गत गरजुंना हजारों मास्कचे वाटप केले आहे. आचार्य चाणक्य शिक्षावेद् 2020 अवाॅर्ड प्राप्त केल्याबद्दल डॉ.आनंदी सिंह यांना समाजातील सर्व स्तरातील लोकांनी आणि अनेक मान्यवरांनी हार्दिक अभिनंदनीय शुभेच्छा दिल्या जात आहेत. डॉ.आनंदी सिंह यांना यंदाचा चाणक्य शिक्षाविद्  अवार्ड

No comments:

Post a comment