तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 September 2020

माजी सरपंच ज्ञानोबा गुंजकर यांचे निधनउपसरपंच भालचंद्र गुंजकर यांना आजोबाशोक


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कौठळी येथील माजी सरपंच ज्ञानोबा (दादा) गोविंदराव गुंजकर यांचे दु:खद निधन झाले. त्यांचे मत्यू.समयी 86 वर्षे होते. उपसरपंच भालचंद्र गुंजकर यांचे ते आजोबा होत.
          तालुक्यातील कौठळी येथील रहिवाशी माजी सरपंच ज्ञानोबा (दादा) गोविंदराव गुंजकर हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते.  राहत्या घरी मंगळवार, दि.15 सप्टेंबर रोजी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 86 वर्षे होते. गावचे सरपंच पद, चेअरमन , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, खरेदी-विक्री संघाचे सदस्यापद भुषविलेले आहेत.  वारकरी संप्रदायाचे वारकरी म्हणून परिचित होते. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या व अतिशय सुस्वभावी, प्रेमळ, धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने परिसरात व पंचक्रोशीतील तसेच धार्मिक, शैक्षणिक , राजकिय व सामाजिक क्षेत्रात सतत सक्रिय होते. गावच्या विकासासाठी भरवी कामगिरी केली आहे. तसेच कौठळी ग्रामपंचायत स्थापनेपासून ते आजपर्यंत गावच्या योगदानाबद्दल त्यांनी केलेली कामे वाखानण्याजोगी आहेत.  त्यांच्या धाडसी आणि मनमोकळ्या स्वभावाने ते  परळी तालुक्यातील राजकिय, सामाजीक क्षेत्रातील सुपरिचित व्यक्तीमत्व होते.      
         स्व.ज्ञानोबा (दादा)गोविंदराव गुंजकर यांच्या पार्थिवावर दि.15 सप्टेंबर रोजी कोठळी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक, सर्व स्तरावरील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय, व्यापारी, साधुसंत, पत्रकार, वकील, प्राध्यापक, पोलिस कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक व आप्तस्वकीय मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 
         स्व.ज्ञानोबा (दादा)गोविंदराव गुंजकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा भरगच्च परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गुंजकर परिवाराच्या दुःखात दै. - - - - - - - परिवार सहभागी आहे. 

राख सावडण्याचा कार्यक्रम 
      दरम्यान स्व. गुंजकर यांचा राख सावडण्याचा कार्यक्रम गुरुवार, सकाळी 8 वाजता होणार असल्याचे कुटुंबींयांनी सांगितले.

No comments:

Post a comment