तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 September 2020

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक,पत्नी,पाल्य यांना विशेष पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बीड, दि,16 :- (जि.मा.का.) जिल्हयातील सर्व माजी सैनिकांना कळविण्यात येते की, माजी सैनिक,पत्नी,पाल्य यांनी राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य,गायन,वाद्य,नृत्य ईत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे सर्व क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पुर,जळीत,दरोडा अपघात व इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहूमोल कामगिरी करणारे, सामाजिक कार्य आणि पर्यावरणा विषयी पुरस्कार मिळविणारे तसेच देश,राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणिय कार्य करणाऱ्या माजी सैनिक,पत्नी,पाल्यांना अशा आंतरराष्ट्रीय कार्याबद्दल रुपये 25 हजार व राज्यस्तरीय कार्याबद्दल रुपये 10 हजार चा पुरस्कार देण्यात येणार आहे तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळातूर (पुणे,नागपूर,औरंगाबाद,कोल्हापूर,नाशिक,लातूर व केंद्रिय शिक्षा बोर्ड) इयत्ता 10 वी व 12 वी मंडळाच्या परिक्षेमध्ये 90% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील 10 वी चे गुणानुक्रम पहिले पाच पाल्य व 12 वी चे गुणानुक्रम पहिले पाच पाल्य यांना एकरक्कमी रुपये 10 हजार विशेष गौरव पुरस्कार प्रधान करण्यात येणार आहेत व आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएस अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक,विधवा यांचे पाल्यांना एकरक्कमी रुपये 25 हजार विशेष गौरव पुरस्कार प्रधान करण्यात येणार आहेत.
एअर मार्शल व्ही.ए.पाठकर विशेष गौरव पुरस्कार अर्ज करण्याचे आवाहन
जिल्हयातील युध्द विधवा व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांना कळविण्यात येते की, इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या एकूण एक पाल्यांचे नाव एअर मार्शल व्ही.ए.पाठकर विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. 
तरी पात्र माजी सैनिक,विधवापत्नी व त्यांचे पाल्यांना सदर गौरव पुरस्कार मिळविण्यासाठी लागणारी कागदपत्रे तसेच केंद्रिय शिक्षा बोर्ड नई दिल्ली येथून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या ग्रेडशिट निष्पादन प्रमाण पत्रामध्ये गुणानुक्रम व  टक्केवारी दर्शवित नसल्याने संबंधित विद्यालयाचे गुणपत्रक टक्केवारीसह जिल्हा सैनिक कार्यालय, बीड येथे दिनांक 22 सप्टेंबर 2020 पूर्वी सादर करावेत तसेच अधिक माहितीसाठी या कार्यालयाचे दुरध्वणी क्रमांक 02442-222105 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बीड यांनी केले आहे.
*-*-*-*-*-*-*

No comments:

Post a comment