तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 September 2020

रामकिशन दराडे यांचे दुःखद निधन


बाळासाहेब दराडे यांना पितृशोक 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील वंजारवाडीचे माजी सरपंच रामकिसन भाऊसाहेब दराडे यांचे दुःखद निधन झाले आहे. भाजपचे युवक नेते बाळासाहेब दराडे यांचे ते वडील होत. 
      वंजारवाडी (ता. परळी वैजनाथ) येथील रहिवासी, जुने जाणते कार्यकर्ते आणि माजी सरपंच रामकिसन दराडे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यातच त्यांची राहत्या घरी आज बुधवार दि. ९ सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजण्याचे सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय अंदाजे ७० वर्षे होते. भाजपचे युवक नेते बाळासाहेब दराडे यांचे ते वडील होत. 
     स्व. रामकिसन दराडे यांच्या पार्थिवावर आज सकाळी वंजारवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 
     स्व. रामकिसन दराडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. दराडे परिवाराच्या दुःखात तेजन्यूज हेडलाईन्स परिवार सहभागी आहे. 

राख सावडण्याचा कार्यक्रम 
      दरम्यान स्व. रामकिसन दराडे यांचा राख सावडण्याचा कार्यक्रम उद्या शुक्रवारी सकाळी ७.३० होणार असल्याचे कुटुंबींयांनी सांगितले.

No comments:

Post a comment