तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 September 2020

आमची वसई रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी साधली प्लाझ्मादानाची "हॅट्रीक"महाराष्ट्रातील "कॉन्वालेसंट प्लाझ्मादानाची" हॅट्रीक साधणारा पहिला प्लाझ्मादाता

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पालघर जिल्ह्यातील वाढती कोविड रुग्णसंख्या लक्षात घेता हि रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळी प्लाझ्मा थेरपीचा वापर अतिगंभीर कोविड रुग्णांच्या उपचारांसाठी व्हावा यासाठी आवश्यक ती जनजागृती करण्यासाठी उपाययोजना करण्यासंबंधी सकारात्मक भूमिका सर्वस्तरावर साथिया ट्रस्ट ब्लड बँकचे चेअरमन विजय महाजन करत आहेत. 

नालासोपाराचे युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या सूचनेवजा मागणीनुसार साथिया ट्रस्ट ब्लड बँकचे चेअरमन विजय महाजन यांनी प्लाझ्मा बँकची आवश्यक ती कागद पूर्तता करून सरकारकडून प्लाझ्माबँक करीता परवानगी आणली. सुरवातीला प्लाझ्मादात्यांची यादी मिळणे सरकारी नियमांनुसार अडचणीचे ठरू पाहत होते अशातच आमची वसई रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी स्वत:हून पुढाकार घेत ५ ऑगस्ट २०२० रोजी प्लाझ्मादान करण्यास सुरूवात केली व लोकांमधील असलेला गैरसमज दूर व्हावा व प्लाझ्मा दाते पुढे यावेत यासाठी प्रयत्नशील राहिले. २० ऑगस्ट व ५ सप्टेंबर रोजी पुन्हा प्लाझ्मादान करत राजेंद्र ढगे यांनी कॉन्वालेसंट प्लाझ्मादान करून हॅट्रीक साधली व महाराष्ट्रातील पहिले हॅट्रीक साधणारे प्लाझ्मादाते ठरले! 

वसईचे लोकप्रिय आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्लाझ्मादानासाठी आवाहन करत प्लाझ्मादात्यांना पुढे येण्यासाठी सूचना देत त्यांच्या आवाहानास सकारात्मक प्रतिसाद देत प्लाझ्मादाते प्लाझ्मादान करण्यासाठी पुढे येऊ लागले. एपीआय संतोष सोलनकर, पो कॉन्स्टेबल विवेकानंद मुगबे, पवन शिंदे, शौनक व्यास व अजून १० प्लाझ्मादात्यांनी प्लाझ्मादान करून अतिगंभीर कोविड रुग्णांच्या उपचारांसाठी सामाजिक पाऊल उचलले. अशा प्लाझ्मादात्यांचा सत्कार वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर व नालासोपारा युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.

No comments:

Post a comment