तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 13 September 2020

गट विकास अधिकारी बेले यांच्या चौकशीसाठी तहसीलदारांना निवेदन

जन परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था झाली आक्रमक

हिंगोली  प्रतिनिधी

सेनगाव येथील गटविकास अधिकारी श्री बेले यांनी तालुक्यातील जैविक नोंदवही कामे वाट पाहत केलेल्या तुझा भावाने परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आक्रमक झाले असून त्यांची चौकशी करावी अशी मागणी 11 सप्टेंबर रोजी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मानव विकास निर्देशांकात मागासलेल्या सेनगाव तालुक्याचा विकास अधिकाऱ्यां च्या स्वार्थापोटी हि झालेला नाही. या तालुक्यात जैविक बोर्ड नागपुर महाराष्ट्र यांच्याकडून प्रशासनाला प्राप्त आदेशानुसार जैवविविधता नोंदवही बनविण्याचे काम गटविकास अधिकारी श्री बैल यांच्याकडे सोपविण्यात आली होती. तालुकास्तरावर गटविकास अधिकार्‍यांकडे या कामाचे जबाबदारी देण्यात आलेली आहे. परंतु सेनगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री बेले यांनी आपली जबाबदारी सर्वार्थाने केवळ दोन संस्थांना कामे देऊन उरकली आहेत. त्यामुळे महामंडळाच्या उद्देशाला ही तडा गेला आहे एवढेच नाही तर श्री बेले यांनी त्यांच्या मर्जीतील दोन संस्थांना ग्रामसेवकांच्या मासिक बैठकीत एकाच छताखाली सर्व ग्रामपंचायतींचे जैविक नोंदवही चे करार करून दिले याबाबत त्यांच्याशी विचारणा केली असता आम्ही फोन केला होता. असे सांगितले. परंतु अशा प्रकारचा कोणताही फोन या कामासाठी सलग दोन महिने ाठपुरावा करणार्‍या जन परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष किंवा पदाधिकाऱ्यांना आला नाही रिबेल यांना खोलात जाऊन विचारणा केली असता त्यांनी मी एकटाच या कामात नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांची चौकशी करावी व उर्वरित छान संस्थांना या कामासाठी प्रस्ताव स्वीकारून त्यांना सदरील कामे द्यावीत अशी मागणी परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर संस्थेचे अध्यक्ष गजानन जोगदंड, सचिव नितीन दांडगे, कोषाध्यक्ष मोहन कांबळे, जगन्नाथ पुरी, जगन्नाथ वाडेकर यांची नावे आहेत. तर जगन्नाथ पुरी यांची स्वाक्षरी आहे.


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment